शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गोळाफेकपटू कृष्णा पुनीया बनली आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 15:46 IST

राजस्थानातून काँग्रेसतर्फे विजयी, ऐझवाल फूटबॉल क्लबचे मालकही जिंकले निवडणूक

ठळक मुद्देपुनिया हीसुध्दा काँग्रेसतर्फे निवडून आली आहे.राजस्थानमधील सदलपूर मतदारसंघातून ती १८ हजारापेक्षा अधिक मतांनी निवडून आली आहे. राजकारणाच्या मैदानात ती प्रथमच जिंकली आहे.

ललित झांबरे : अलीकडच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाचा फायदा खेळाडूंनाही झाला आहे. या निवडणूकीत राष्ट्रकूल सामन्यांतील माजी सुवर्ण पदक विजेती गोळाफेकपटू कृष्णा पुनिया हीसुध्दा काँग्रेसतर्फे निवडून आली आहे. राजस्थानमधील सदलपूर मतदारसंघातून ती १८ हजारापेक्षा अधिक मतांनी निवडून आली आहे. राजकारणाच्या मैदानात ती प्रथमच जिंकली आहे, कारण २०१३ च्या निवडणूकीत ती पराभूत झाली होती. 

कृष्णाने २०१० च्या दिल्ली राष्ट्रकूल सामन्यांमध्ये ६१.५ मीटर अंतरावर गोळाफेक करुन सुवर्णपदक जिंकले होते. यासह ती राजकारणात सफल ठरलेले खेळाडू अस्लम शेरखान, चेतन चौहान, नवज्योतसिंह सिध्दू, राज्यवर्धन राठौड, ज्योतीर्मयी सिकदर, किर्ती आझाद यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. 

कृष्णाप्रमाणेच  मिझोरममधील निवडणूकीत  ऐझवाल फुटबॉल क्लबचे मालक रॉबर्ट रॉयटे हेसुध्दा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. मिझोरम पूर्व २ मतदारसंघातून ते मिझो नॅशनल फ्रंटकडून निवडून आले आहेत. विद्यमान केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठौड हे २०१४ च्या निवडणूकीत जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे सी पी जोशी यांचा तीन लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. 

मध्यम पल्ल्याची धावपटू ज्योतीर्मयी सिकदर ही पश्चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून माकपाची उमेदवार म्हणून निवडून आली होती.  ऑलिम्पिक हॉकीपटू अस्लम शेरखान हे १९८४ व १९९१ मध्ये मध्यप्रदेशच्या बैतूल लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस  खासदार होते. किर्ती आझाद हे भाजपाचे तीन वेळा खासदार आहेत. १९९९, २००९ व २०१४ मध्ये ते दरभंगा मतदारसंघातून विजयी झाले होते. 

काँग्रेसचे  नवज्योतसिंग सिध्दू हे पंजाबच्या विद्यमान मंत्रिमंडळात पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आहेत त्याआधी ते भाजपाचे खासदारही राहिलेले आहेत. चेतन चौहान हे उत्तरप्रदेशातील भाजपा सरकारमध्ये  क्रीडा मंत्री आहेत. उत्तर प्रदेशच्या अमरोहा मतदारसंघाचेही ते दोन वेळा खासदार होते.

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थान