शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचा दिमाखात प्ले आॅफ प्रवेश

By admin | Updated: May 22, 2016 02:36 IST

सुरेश रैनाचे चमकदार अर्धशतक, ब्रॅडन मॅक्युलमची फटकेबाजी व ड्वेन स्मिथचा अष्टपैलू खेळ या जोरावर गुजरात लायन्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला.

कानपूर : कर्णधार सुरेश रैनाचे चमकदार अर्धशतक, ब्रॅडन मॅक्युलमची फटकेबाजी व ड्वेन स्मिथचा अष्टपैलू खेळ या जोरावर गुजरात लायन्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत अग्रस्थान मिळवत दिमाखात प्ले आॅफमध्ये प्रवेश केला. तर, मुंबईचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने मुंबईला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. आक्रमक सुरुवातीनंतर फलंदाजी ढेपाळल्याने मुंबईकरांनी ८ बाद १७२ धावा अशी मजल मारली. गुजरातने १७.५ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १७३ धावा काढल्या. अ‍ॅरोन फिंच शून्यावर बाद झाल्यानंतर मॅक्युलम - रैना यांनी ९६ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. मॅक्युलम (२७ चेंडंूत ४८) बाद झाल्यानंतर रैनाने ३६ चेंडंूत ८ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा काढून गुजरातला विजयी मार्गावर आणले. जसप्रीत बुमराहने रैनाला बाद करून मुंबईच्या आशा काही प्रमाणात पल्लवित केल्या. मात्र, स्मिथने फलंदाजीतही कमाल करताना २३ चेंडंूत नाबाद ३७ धावांचा तडाखा देत मुंबईचा पराभव निश्चित केला.तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माच्या फटकेबाजीनंतर स्मिथ व धवल कुलकर्णीच्या अचूक गोलंदाजीपुढे मुंबईच्या धावसंख्येला खीळ बसली. धवलने रोहितला (३०) चौथ्या षटकात बाद केल्यानंतर स्मिथने ५व्या षटकात मार्टिन गुप्टील (७) व कृणाल पंड्या (४) यांना बाद करून मुंबईला मोठा धक्का दिला.मात्र, युवा नितीश राणाने ३६ चेंडंूत ७ चौकार व ४ षटकारांसह ७० धावा कुटल्या. त्याने जोस बटलरसह चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करून मुंबईला सावरले. बटलर ३१ चेंडंूत ३३ धावा काढून परतला. यानंतर राणाही लगेच बाद झाल्याने पुन्हा मुंबईच्या धावांना ब्रेक लागला.