कामगिरी चांगली होईल : रोहित

By Admin | Updated: December 8, 2014 00:57 IST2014-12-08T00:57:31+5:302014-12-08T00:57:31+5:30

येथे दोन आठवडे प्रवास केल्यानंतर आणि दोन सराव सामने खेळल्यामुळे येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी भारतीय संघाला मदत मिळाली असल्याने पहिल्या कसोटीत संघ चांगली कामगिरी

Performance will be good: Rohit | कामगिरी चांगली होईल : रोहित

कामगिरी चांगली होईल : रोहित

अ‍ॅडिलेड : येथे दोन आठवडे प्रवास केल्यानंतर आणि दोन सराव सामने खेळल्यामुळे येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी भारतीय संघाला मदत मिळाली असल्याने पहिल्या कसोटीत संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास भारताचा फलंदाज रोहित शर्मा याने व्यक्त केला आहे. तो म्हणाला, गेल्या दोन आठवड्यांपासून आम्ही येथे आहोत आणि दोन सराव सामनेही खेळलो आहोत. येथील खेळपट्टींचा अंदाज आला असल्याने वातावरणाशी जुळवून घेणे सोपे झाले आहे.
ह्युजच्या निधनावर रोहित म्हणाला, ही दु:खद घटना होती. या परिस्थितीत खेळणे कठीण असले तरी क्रिकेट सुरूच राहील. चांगल्या कामगिरीसाठी संघही मानसिकदृष्ट्या तयार आहे. सर्वांच्या मनात ही दु:खद घटना असेल, परंतु मैदानावर आमचे फोकस चांगल्या कामगिरीवर असेल.
गत परदेशी दौऱ्यावर मला छाप सोडण्यात अपयश आले, परंतु तयारीवर मी फोकस केले. मला आव्हानाची प्रतीक्षा आहे हा दौरा आव्हानात्मक आहे आणि चांगल्या कामगिरीसाठी मी उत्सुक आहे.

Web Title: Performance will be good: Rohit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.