हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:24 IST2026-04-06T14:21:24+5:302026-04-06T14:24:02+5:30

Payal Nag: पायलने तिचे प्रेरणास्थान असलेल्या विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन शीतल देवी हिला पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

Payal Nag Wins Gold at World Para Archery Series After Defeating World Champion Sheetal Devi | हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'

हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'

Payal Nag: जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते, याचे ताजे उदाहरण म्हणजे 18 वर्षीय पायल नाग. दोन्ही हात आणि पाय गमावूनही पायल नागने बँकॉक येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, पायलने तिचे प्रेरणास्थान असलेल्या विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन शीतल देवी हिला पराभूत केले.

वर्ल्ड चॅम्पियनला हरवत जिंकले गोल्ड

बँकॉक येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज स्पर्धेत पायल नागने अंतिम सामन्यात भारताची विश्वविजेती शीतल देवी हिला 139-136 अशा फरकाने पराभूत केले. या विजयासह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पायल नागची संघर्षमय कहाणी

पायल नागची यशोगाथा जितकी प्रेरणादायी आहे, तितकीच वेदनादायक आहे. पायल तिसरीत शिकत असताना आपल्या भावासोबत एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर खेळत होती. त्या वेळी ती चुकून ती वीजतारांच्या संपर्कात आली. 11,000 व्होल्टच्या विजेचा जोरदार धक्का बसल्यामुळे तिला आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय गमवावे लागले.

नातेवाईकांनी दिला मारण्याचा सल्ला...

अपघातानंतर पायलची अवस्था पाहून काही नातेवाईकांनी तिच्या आई-वडिलांना धक्कादायक सल्ला दिला. हात-पाय नसल्यामुळे ती खाऊ शकणार नाही, चालू शकणार नाही, त्यामुळे तिला जिवंत ठेवण्यापेक्षा विष देण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, पायलचे वडील विजय कुमार नाग, जे ओडिशातील बेलांगीर जिल्ह्यात मजुरी करतात, त्यांनी कोणाचाही सल्ला ऐकला नाही आणि आपल्या मुलीला जगवण्याचा निर्णय घेतला.

अनाथालयातून सुरू झाला क्रीडा प्रवास

पायलला पार्वती गिरी बाल निकेतन अनाथालयात ठेवण्यात आले. याच काळात तिच्या आयुष्यात खेळ आला आणि तिने पॅरा आर्चरीकडे वाटचाल सुरू केली. 2023-24 मध्ये तिने कटरा येथील माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे प्रशिक्षण घेतले. तिथेच तिने शीतल देवीसोबत सराव केला.

राष्ट्रीय स्तरापासून जागतिक विजेतेपदापर्यंत

2025 मध्ये पायल नागने राष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले, त्यानंतर सातत्याने चांगली कामगिरी केली. आता वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीजमध्ये सुवर्णपदक जिंकून तिने जागतिक स्तरावर मोठे यश मिळवले आहे. पायलने आपल्या अपंगत्वावर मात करत जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. तिची ही कामगिरी देशातील लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title : पायल नाग ने विकलांगता के बावजूद विश्व पैरा तीरंदाजी में स्वर्ण जीता।

Web Summary : अठारह वर्षीय पायल नाग, जिन्होंने अपने हाथ और पैर खो दिए, ने विश्व पैरा तीरंदाजी श्रृंखला में स्वर्ण जीता, विश्व चैंपियन शीतल देवी को हराया। अत्यधिक विपरीत परिस्थितियों को पार करते हुए, पायल का लचीलापन लाखों लोगों को प्रेरित करता है। कभी जीने के खिलाफ सलाह दी गई, वह अब विश्व स्तर पर चमक रही है।

Web Title : Payal Nag wins gold at World Para Archery Series despite disability.

Web Summary : Eighteen-year-old Payal Nag, who lost both hands and legs, won gold at the World Para Archery Series in Bangkok, defeating world champion Sheetal Devi. Overcoming immense adversity, Payal's resilience inspires millions. Once advised against living, she now shines globally.

टॅग्स :Indiaभारत