ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:08 IST2025-10-08T17:45:55+5:302025-10-08T18:08:45+5:30
या कारवाईमुळे अमन सेहरावत आता मोठ्या स्पर्धेला मुकणार

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
Olympic Medalists Aman Sehrawat Has Been Banned For 1 Year By WFI : भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) ऑलिम्पिक पदक विजेत्या अमन सेहरावत (Aman Sehrawat ) याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कुस्तीपटू अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य पदकाची कमाई करुन दिली होती. एवढेच नाही तर अवघ्या २१ वर्षे २४ दिवस वयात ऑलिम्पिक पदक जिंकत त्याने इतिहास रचला होता. भारताकडून सर्वात कमी वयात ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. इथं जाणून घेऊयात असं काय घडलं? ज्यामुळं भारतीय कुस्ती महासंघाने एवढा मोठा निर्णय घेतला त्यासंदर्भात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वजन वाढलं अन् अपात्र ठरला, लगेच निलंबनाची कारवाई
जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत लढत न खेळता स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ आल्यानंतर अमन सेहरावत याच्यावर भारतीय कुस्ती महासंघानं एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई केली आहे. या स्पर्धेत अमन पुरुष फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात ५७ किलो वजनी गटातून सहभागी झाला होता. लढती आधी निर्धारित वजनापेक्षा १.७ किलो अधिक वजन भरल्यामुळे तो जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील लढतीसाठी अपात्र ठरला होता. याच पार्श्वभूमीवर भारतीय कुस्ती महासंघाने २३ सप्टेंबरला त्याला कारणे दाखवा नोटिस पाठवले. कुस्तीपटूनं जे उत्तर दिले ते समाधानकारक नाही, असे सांगत कुस्ती महासंघाने त्याच्यावर एक वर्षे बंदीची कारवाई केली आहे.
या कारवाईमुळे अमन सेहरावत आता मोठ्या स्पर्धेला मुकणार
कुस्ती महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, कारणे दाखवा नोटीस मिळाल्यावर कुस्तीपटू अमन याने २९ सप्टेंबरला उत्तर दिले, पण अनुशासन समितीला ते समाधानकारक वाटले नाही. कुस्तीपटूने जी बाजू मांडली त्यावर परीक्षण केले. मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांना या प्रकरणात स्पष्टीकरणासाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर युवा कुस्तीपटूवर कठोर अनुशासनात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमन २०२६ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकणार आहे. कारण ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.