शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

Olympics 2024 : बुमराह, क्रिकेट आणि बॉलिवूड! पदकांची संख्या अन् सायना संतापली? टीकाकारांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 19:01 IST

Paris Olympics 2024 updates : सायना नेहवालने अतिउत्साही चाहत्यांना सुनावले.

saina nehwal olympics : भारतातील क्रीडा संस्कृती आणि क्रिकेटला दिले जाणारे महत्त्व याबद्दल दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सातत्याने भाष्य करत आहे. क्रिकेटला प्राधान्य आणि इतर खेळांकडे होत असलेले दुर्लक्ष यावर बोट ठेवत तिने काही अतिउत्साही क्रिकेट चाहत्यांना डिवचल्याचे दिसते. यावरून तिला ट्रोल केले जात आहे. आता तिने याच ट्रोलर्स लोकांना प्रत्युत्तर देताना विविध बाबींवर भाष्य केले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण सात पदके जिंकली होती. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. पण, भारताला केवळ सहा पदके जिंकता आली आहेत. यामध्ये पाच कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. भारताच्या या निराशाजनक कामगिरीनंतर सायना नेहवालने पदकांची आशा बाळगणाऱ्या टोमणे मारले. 

सायनाच्या म्हणण्यानुसार, क्रिकेटच्या तुलनेत बॅडमिंटन आणि टेनिससह इतर खेळ खूप साहसी आहेत. यामध्ये दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. सायनाचे हे विधान काही क्रिकेट चाहत्यांना खटकले. एकाने याबद्दल सोशल मीडियावर लिहिले होते की, सायना जसप्रीत बुमराहच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करू शकेल काय. यावर आता सायनाने एका पॉटकास्टमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 

सायनाचे टीकाकारांना प्रत्युत्तर बॅडमिंटन खेळताना खूप थकवा जाणवतो. सतत हातांची हालचाल होत असते. हात वरती घेऊन स्ट्रोक खेळावे लागतात. बराच वेळ हातांची हालचाल होत असल्याने ते कठीण होते. मी अनेकदा बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याचे पाहिले आहे. बॅडमिंटन सर्वात कठीण खेळ आहे असे मी म्हणत नाही. टेनिस, पोहणे या खेळांचा देखील मी उल्लेख केला होता. क्रिकेट आणि फुटबॉलमध्येही खूप मेहनत लागते. पण, तुलना केल्यास क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना फार जोखीम घ्यावी लागत नाही. आपल्याकडे चांगले कौशल्य असल्यास सहजरित्या फलंदाजी करता येते. क्रिकेटमध्ये फिटनेस महत्त्वाचा नसतो असे मी म्हटले नव्हते, असे सायनाने सांगितले. 

तसेच क्रिकेटमधील मोजकेच खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे बनू शकतात. क्रिकेट पूर्णपणे स्कील बेस्ड स्पोर्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी जसप्रीत बुमराहसोबत का खेळावे. मला थोडी मरायचे आहे. मी आठ वर्षांपासून खेळत असते तर नक्कीच टीकाकारांना उत्तर दिले असते. जर बुमराहसोबत बॅडमिंटन खेळले तर तो कदाचित माझा स्मॅश शॉट खेळू शकणार नाही, असे सायनाने मिश्किलपणे म्हटले. 

सायना नेहवालने आणखी सांगितले की, आपण आपल्या देशात या गोष्टींवरून आपापसात भांडायला नको असे मला वाटते. प्रत्येक खेळ चांगलाच आहे पण इतरही खेळांना महत्त्व द्यायला हवे. तेव्हाच भारतात क्रीडा संस्कृती रूजेल. आमचे लक्ष नेहमीच क्रिकेट आणि बॉलिवूडवर असते. जर कोणी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले तर आम्ही कौतुक करतो. पण त्यानंतर काय होणार? चार-पाच पदकांवर आपण थांबायचे का? अजून पदके नकोत का? त्यात आपण आनंदी होऊ का? आपल्या देशात केवळ आणि केवळ क्रिकेटला महत्त्व दिले जाते. अन्य खेळांना सुविधा किंवा आर्थिक मदत केली जात नाही. क्रिकेटपटूंना जे सहकार्य मिळते ते इतर खेळाडूंना मिळत नाही. क्रिकेटप्रमाणे इतर खेळांनाही देशात चांगल्या सुविधा मिळाल्या, तर ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी सुधारेल आणि चीन, अमेरिकेप्रमाणे पदके जिंकण्यातही भारतीय खेळाडू यशस्वी होतील. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Saina Nehwalसायना नेहवालjasprit bumrahजसप्रित बुमराहbollywoodबॉलिवूडBadmintonBadminton