शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Paris Olympics 2024 : भारत हॉकीत गोल्ड कसं जिंकणार? कोण कोणाशी भिडणार? रविवारी ठरणार भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:58 IST

india hockey olympics 2024 : भारताच्या हॉकी संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली. 

india hockey olympics : भारताच्याहॉकी संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली. टीम इंडियाने तब्बल ५२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा ऑलिम्पिकमध्ये पराभव केला. शेवटच्या वेळी भारताने १९७२ मध्ये कांगारूंना या व्यासपीठावर पराभूत केले होते. भारताने आतापर्यंत तीन विजय मिळवले आहेत, बेल्जियमविरूद्धचा पराभव वगळता विजयरथ कायम आहे. बेल्जियमने टीम इंडियाचा १-२ असा पराभव केला. भारताने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडचा पराभव केला आहे. तर अर्जेंटिनाविरूद्धचा सामना अनिर्णित संपला.

भारतीय संघाचा फॉर्म पाहता सुवर्ण पदकाच्या आशा जिवंत आहेत. कर्णधार हरमनप्रीत सिंगनेही सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास व्यक्त केला. भारताचा पुढील सामना रविवारी ग्रेट ब्रिटनसोबत होणार आहे. हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत, ४ ऑगस्ट रोजी जर्मनी विरुद्ध अर्जेंटिना, भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम विरुद्ध स्पेन असे सामने होणार आहेत. इथे भारतीय संघ ग्रेट ब्रिटनचा पराभव करण्यात यशस्वी झाला तर उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल. भारताने उपांत्य फेरी गाठल्यास उपांत्य फेरीत त्यांचा सामना जर्मनी किंवा अर्जेंटिनाशी होऊ शकतो. उपांत्य फेरीचे सामने ६ ऑगस्टला होणार आहेत, तर सुवर्ण आणि कांस्य पदकांचे सामने ८ ऑगस्टला होणार आहेत.

भारताला काय करावे लागेल?भारताला रविवारी होणाऱ्या सामन्यात ग्रेट ब्रिटनविरूद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. असे झाल्यास टीम इंडिया उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या क्वार्टर फायनलमधील विजेत्या संघाविरूद्ध खेळेल. अर्जेंटिना आणि जर्मनी यांच्यातील विजयी संघासोबत भारताची लढत होईल. 

सुवर्ण पदकाचा रोडमॅपक्लार्टर फायनल 

  1. जर्मनी विरूद्ध अर्जेंटिना
  2. भारत विरूद्ध ग्रेट ब्रिटेन
  3. नेदरलँड्स विरूद्ध ऑस्ट्रेलिया
  4. बेल्जियम विरूद्ध स्पेन

सेमी फायनलक्वार्टर फायनल १ मधील विजयी संघ विरूद्ध २ मधील विजयी संघक्वार्टर फायनल ३ मधील विजयी संघ विरूद्ध ४ मधील विजयी संघ

सुवर्ण पदकासाठी लढतसेमी फायनल १ मधील विजयी संघ विरूद्ध २ मधील विजयी संघ

कांस्य पदकासाठी लढतसेमी फायनल १ मधील पराभूत संघ विरूद्ध २ मधील पराभूत संघ

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४HockeyहॉकीIndiaभारतGold medalसुवर्ण पदक