शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

महिला स्विमरचा Video बनवल्या प्रकरणी दिव्यांग जलतरणपटू प्रशांत करमाकर निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 2:37 PM

ख्यातनाम दिव्यांग जलतरणपटू प्रशांत करमाकरवर भारताच्या पॅरालिम्पिक समितीने तीन वर्षांची बंदी घातली आहे. प्रशांतने कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये भारतासाठी कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती.

ठळक मुद्देअर्जुन पुरस्कार विजेत्या महिला जलतरणपटूने लिखितमध्ये प्रशांत करमाकरची तक्रार केल्यानंतर पॅरालिम्पिक समितीने त्याला निलंबित केले होते. महिला स्पर्धकाच्या पालकांनी या व्हिडिओ चित्रीकरणावर आक्षेप घेत तक्रार केली.

नवी दिल्ली - ख्यातनाम दिव्यांग जलतरणपटू प्रशांत करमाकरवर भारताच्या पॅरालिम्पिक समितीने तीन वर्षांची बंदी घातली आहे. प्रशांतने कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये भारतासाठी कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती. महिला जलतरणपटूचा स्विमिंग करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला म्हणून पॅरालिम्पिक समितीने प्रशांतवर इतकी कठोर कारवाई केली आहे. मागच्यावर्षी जयपूरमध्ये 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपची स्पर्धा झाली. त्यावेळी ही घटना घडली होती. 

अर्जुन पुरस्कार विजेत्या महिला जलतरणपटूने लिखितमध्ये प्रशांत करमाकरची तक्रार केल्यानंतर पॅरालिम्पिक समितीने त्याला निलंबित केले होते. स्पर्धेदरम्यान प्रशांतने त्याचा कॅमेरा एका सहकाऱ्याकडे देऊन महिला स्पर्धकाचा स्विमिंग करतानाचा व्हिडिओ काढायला सांगितला होता. महिला स्पर्धकाच्या पालकांनी या व्हिडिओ चित्रीकरणावर आक्षेप घेत तक्रार केली. त्यावेळी पॅरालिम्पिक समितीचे चेअरमन डॉ. व्ही.के.दाबास यांनी व्हिडिओ काढणाऱ्याला बोलवून जाब विचारला. त्यावेळी त्याने आपण प्रशांत करमाकरच्या सांगण्यावरुन व्हिडिओ बनवत असल्याचे सांगितले. 

 त्यानंतर प्रशांत करमाकर विरोधात पुन्हा अशीच तक्रार आली. त्यावेळी करमाकर स्वत: ट्रायपॉडवर कॅमेरा ठेऊन चित्रीकरण करत होता. ज्यावेळी करमाकरला व्हिडिओ डिलीट करायला सांगितला त्यावेळी त्याने माझ्या माणसाला व्हिडिओ बनवण्यापासून का रोखले ? असा प्रतिप्रश्न करुन वाद घातला. त्याने पदाधिकाऱ्यांना त्याच्या विरोधात लिखित तक्रार आली आहे का? असे विचारले. त्यावेळी  संबंधित मुलीच्या पालकांनी लिखित तक्रार नोंदवली. याच प्रकरणात त्याच्यावर तीन वर्ष बंदीची कारवाई केली आहे.