पॅरा आशियाई क्रीडा; पहिल्या दिवशी भारताने जिंकली पाच पदके

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 02:50 AM2018-10-08T02:50:29+5:302018-10-08T02:51:13+5:30

भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात फर्मान बाशा आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.

Para Asian Games; India won five medals on the first day | पॅरा आशियाई क्रीडा; पहिल्या दिवशी भारताने जिंकली पाच पदके

पॅरा आशियाई क्रीडा; पहिल्या दिवशी भारताने जिंकली पाच पदके

Next

जकार्ता : भारतीय संघाने आशियाई पॅरा स्पर्धेत दमदार सुरूवात करताना पहिल्या दिवशी दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदकांची कमाई केली. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात फर्मान बाशा आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून १-२ असा निसटता पराभव पत्करावा लागला. सुहास यथीराजने एकेरीच्या पहिल्या लढतीत मलेशियाच्या बाक्री ओमारचा २१-८, २१-७ असा पराभव केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात सुहासने आक्रमक खेळ करताना सहज बाजी मारली. मात्र, दुहेरीत कुमार राज व तरुण या जोडीला आणि परतीच्या एकेरीत चिराग बरेथा यांना पराभव पत्करावा लागल्याने भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
पॉवरलिफ्टिंग प्रकारात पुरुषांच्या ४९ किलो गटात लाओ प्रजासत्ताकच्या लाओपाकडी पीयाने १३३ किलो वजन उचलून सुवर्ण नावावर केले. भारताच्या फर्मानने १२८ किलोसह रौप्य व परमजीतने १२७ किलोसह कांस्यपदक जिंकले.

जलतरणमध्ये पाडली छाप
महिलांच्या जलतरण स्पर्धेत १०० मी बटरफ्लाय प्रकारात देवांशी सतीजावनने रौप्य, तर सुयश जाधवने पुरुषांच्या २०० मीटर वैयक्तिक मेडलेमध्ये कांस्य पटकावले. बुद्धिबळमध्ये भारतीय खेळाडूंनी आपले सर्व सामने जिंकताना शानदार कामगिरी केली.

Web Title: Para Asian Games; India won five medals on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.