पंकज अडवाणीची पद्मभूषणसाठी शिफारस

By Admin | Updated: September 9, 2016 00:19 IST2016-09-09T00:19:53+5:302016-09-09T00:19:53+5:30

भारतीय बिलियर्ड आणि स्नूकर महासंघाने चॅम्पियन खेळाडू पंकज अडवाणी याची देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मभूषणसाठी शिफारस केली.

Pankaj Advani's recommendation for Padma Bhushan | पंकज अडवाणीची पद्मभूषणसाठी शिफारस

पंकज अडवाणीची पद्मभूषणसाठी शिफारस

नवी दिल्ली : भारतीय बिलियर्ड आणि स्नूकर महासंघाने चॅम्पियन खेळाडू पंकज अडवाणी याची देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मभूषणसाठी शिफारस केली. १५ वेळा विश्वविजेता राहिलेल्या पंकजचे नाव मागच्या वर्षीदेखील पाठविण्यात आले होते. पण, त्याचा विचार झाला नव्हता. बीएसएफआय सचिव एस. बालसुब्रमण्यम म्हणाले, ‘आम्ही सलग दुसऱ्यांदा पंकजच्या नावाची शिफारस केली. तो या सन्मानाचा हकदार आहे. यंदा हा बहुमान त्याला मिळेल याबद्दल मी आशावादी आहे. ’ अडवाणीला २००४ मध्ये अर्जुन, २००९ मध्ये पद्मश्री, २००६ मध्ये राजीव गांधी खेलरत्न आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Web Title: Pankaj Advani's recommendation for Padma Bhushan