वेगवेगळ्या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानवर नामुष्की ओढवल्याच्या शेकडो घटना तुमच्या ऐकिवात असतील. आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या हॉकी संघावर असाच नामुष्कीजन प्रसंग ओढवला आहे. पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियामधील कॅनबेरा येथे उतरल्यावर हॉटेलने थकित बिल न भरल्याने त्यांचं बुकिंगच रद्द केलं. त्यामुळे हॉटेल न मिळाल्याने पाकिस्तानी खेळाडूंवर बराच वेळ रस्त्यावर भटकत राहण्याची वेळ आली.
हा धक्कादायक प्रकार एफआयएच प्रो लीगच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी संघ आणि अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था एका फोर स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली होती. पाकिस्तानी हॉकी फेडरेशन आणि पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्डाने हॉटेलचं बिल आगावू भरलं असल्याचं सांगण्यात आलं. मात्र खेळाडू जेव्हा कॅनबेरा येथे पोहोचले तेव्हा हॉटेल व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारचे पैसे मिळालेले नाहीत आणि बुकिंगही झालेलं नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. हे ऐकताच पाकिस्तानी खेळाडूंच्या पायाखालची वाळूच सरकली.
दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक ताहिर जमां यांनी पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेमधील अंतर आणि निधीची कमतरता असल्याने बराच वेळ तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे लांबचा प्रवास करून ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या खेळाडूंची ना आराम करण्याची व्यवस्था झाली ना त्यांची भोजनाची व्यवस्था होई शकली.
शेवटी खूप खटपटी लटपटी केल्यावर हॉटेलने पाकिस्तानी संघाला मर्यादित खोल्या दिल्या. त्यामुळे एकाच खोलीत दोन-तीन खेळाडूंना थांबावे लागले. तसेच आरामाविना दुसऱ्या दिवशी मैदानात उतरावे लागले. तिथे थकलेल्या पाकिस्तानी संघाला ऑस्ट्रेलियाकडून २-३ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
Web Summary : Pakistan's hockey team faced embarrassment in Australia after their hotel booking was cancelled due to unpaid bills. Players were left stranded, impacting their performance. They lost to Australia 2-3 after the accommodation fiasco.
Web Summary : पाकिस्तान हॉकी टीम को ऑस्ट्रेलिया में होटल का बिल न चुकाने के कारण शर्मिंदगी का सामना करना पड़ा। खिलाड़ियों को सड़क पर भटकना पड़ा, जिसका असर उनके प्रदर्शन पर पड़ा। आवास विवाद के बाद वे ऑस्ट्रेलिया से 2-3 से हार गए।