शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा सराव जोड

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

कसोटी मालिकेनंतर वन-डे मालिकेमध्ये निराशाजनक कामगिरी करणारा सलामीवीर शिखर धवनने प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. विश्वकप संघात समावेश असलेला शिखर धवन सध्या फॉर्मात नाही. त्याला गेल्या दोन सामन्यांत केवळ ३ धावा करता आल्या.

कसोटी मालिकेनंतर वन-डे मालिकेमध्ये निराशाजनक कामगिरी करणारा सलामीवीर शिखर धवनने प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. विश्वकप संघात समावेश असलेला शिखर धवन सध्या फॉर्मात नाही. त्याला गेल्या दोन सामन्यांत केवळ ३ धावा करता आल्या.
सराव सत्रादरम्यान फ्लेचरने धवनला मार्गदर्शन केले. व्हीडीओ समीक्षकाच्या मदतीने वेगवान गोलंदाजांविरुद्ध धवनच्या पायांच्या हालचालींचे चित्रण करण्यात आले. या व्यतिरिक्त धवनने फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर दुसऱ्या नेट्समध्ये सराव करीत खेळात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिसऱ्या वन-डे लढतीमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. धवन व्यतिरिक्त मधल्या फळीतील कर्णधार धोनीने नेट्समध्ये कसून सराव केला. गेल्या दोन सामन्यांमध्ये धोनीने एकूण ५३ धावा फटकाविल्या. संघातील धावा फटकाविणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनी दुसऱ्या स्थानी आहे. या व्यतिरिक्त अजिंक्य रहाणे व अबांती रायडू यांनी फलंदाजीचा कसून सराव केला. दुखापतीमुळे दुसऱ्या लढतीला मुकलेला रोहित शर्मा सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. विराट कोहलीनेही आज सराव केला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेला युवा फलंदाज विराट कोहलीला गेल्या दोन सामन्यांत केवळ १३ धावा फटकाविता आल्या आहेत. (वृत्तसंस्था)