पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:37 IST2025-05-02T16:36:56+5:302025-05-02T16:37:11+5:30
Arshad Nadeem Pakistan, Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.

पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
Arshad Nadeem Pakistan, Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. नुकतेच भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू अर्शदचे इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आले.
अर्शदसोबत आणखीही अकाउंटवर बंदी
अर्शदचे इन्स्टाग्राम अकाउंट भारतात उपलब्ध नसेल. याशिवाय, अली जफर, हानिया आमिर आणि माहिरा खान यांसारख्या प्रसिद्ध लोकांचे इन्स्टाग्राम प्रोफाइलदेखील भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. भारताची डिजिटल सुरक्षा राखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत सरकारने अनेक पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर बंदी घातली. या यादीत पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर, पाकिस्तानचा माजी कर्णधार बासित अली, रशीद लतीफ, तनवीर अहमद यांच्यासह दोन यूट्युबर्सच्या चॅनेलचाही समावेश आहे.