शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

मूर्ती लहान पण कीर्ती महान: ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे के वाय वेंकटेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 4:13 PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी पद्म पुरस्कारांचे वितरण झालं. यावेळी पॅरा अ‍ॅथलिट के वाय वेंकटेश यांनाही पद्म श्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी पद्म पुरस्कारांचे वितरण झालं. यावेळी पॅरा अ‍ॅथलिट के वाय वेंकटेश यांनाही पद्म श्री  पुरस्कारानं गौरविण्यात आलं. क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानासाठी वेंकटेश यांचा हा सन्मान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात वेंकटेश हे ज्यावेळी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले तेव्हा एक प्रसंग घडला. वेंकटेश हे राष्ट्रपती कोविंद यांच्या दिशेनं चालत आले आणि पायऱ्या चढू लागले, परंतु वेंकटेश व आपल्यातील अंतर फार असल्याचे राष्ट्रपतींना समजले आणि त्यांनी वेंकटेश यांना पायऱ्यांवरून खाली उतरण्यास सांगितले अन् स्वतःही खाली उतरले. त्यावेळी राष्ट्रपती भवनमध्ये उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  कोण आहेत हे के वाय वेंकटेश?२००९साली झालेल्या पाचव्या  Dwarf Olympic ( ठेंगण्यांची ऑलिम्पिक स्पर्धा) भारतीय संघाचे नेतृत्व वेंकटेश यांनी केलं होतं. त्या स्पर्धेत भारतानं १७ पदकं जिंकली होती. ४४ वर्षीय वेंकटेश हे बंगलोरचे आणि त्यांची उंची ४ फुट व २ इंच एवढीच. पण, त्यांची कीर्ती ही महान आहे. वेंकटेश यांना achondroplasia हा अस्थीची वाढ खुंटून बुटकेपणा येणारा आजार आहे. लहानपणापासूनच ते असे आहेत, परंतु त्यांची खेळाप्रती प्रचंड आवड आहे. २००५च्या World Dwarf Games स्पर्धेत वेंकटेश यांनी सहा पदकं जिंकून  Limca Book of Recordsमध्ये जागतिक स्पर्धेत सर्वाधिक पदकं जिंकण्याच्या विक्रमाची नोंद केली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिले खेळाडू होते आणि त्यांनी अ‍ॅथलेटिक्स व बॅडमिंटन क्रीडा प्रकारात ही पदकं जिंकली. पॅरालिम्पिक प्रमाणे चार वर्षांतून एकदा World Dwarf Games स्पर्धा होते.

१९९४ साली त्यांनी कारकीर्दिला सुरुवात केली आणि जर्मनीत झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक कमिटी  अ‍ॅथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला. आता ते निवृत्त झाले असून कर्नाटक पॅरा-बॅडमिंटन संघटनेचे सचिव आहेत.    

टॅग्स :padma shri awardsपद्मश्री पुरस्कारParalympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाBadmintonBadmintonRamnath Kovindरामनाथ कोविंद