डोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतून पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 02:43 IST2020-01-17T02:42:41+5:302020-01-17T02:43:01+5:30

याआधी सायना नेहवालचा पराभव झालेला असल्याने महिला एकेरीत सिंधूच्या रुपाने भारताचे एकमेव आव्हान शिल्लक होते.

 P. V Sindhu's challenge ends | डोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतून पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात

डोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतून पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात

जकार्ता : भारताची अव्वल महिला शटलर पी. व्ही. सिंधू हिला गुरुवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात जपानच्या सयाका ताकाहाशी हिने सायनाचा १६-२१, २१-१६, २१-१९ असा झुंजार पराभव केला.

याआधी सायना नेहवालचा पराभव झालेला असल्याने महिला एकेरीत सिंधूच्या रुपाने भारताचे एकमेव आव्हान शिल्लक होते. मात्र रोमांचक लढतीत मोक्याच्यावेळी केलेल्या चुकांचा फटका बसल्याने सिंधूलाही स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूचा या लढतीपूर्वी सयाकाविरुद्धचा रेकॉर्ड ४-२ असा होता. या स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत सयाकाने सायनाला पराभूत करत आगेकूच केली होती.

Web Title:  P. V Sindhu's challenge ends

टॅग्स :BadmintonBadminton