शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आॅरेंज कॅप केवळ औपचारिकता

By admin | Updated: May 29, 2016 00:28 IST

शानदार नेतृत्वक्षमतेच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाला आयपीएलच्या नवव्या सत्रात अंतिम फेरी गाठून देणारा स्टार फलंदाज विराट कोहली आॅरेंज कॅपचा मानकरी ठरण्यासाठी

बेंगळुरू : शानदार नेतृत्वक्षमतेच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाला आयपीएलच्या नवव्या सत्रात अंतिम फेरी गाठून देणारा स्टार फलंदाज विराट कोहली आॅरेंज कॅपचा मानकरी ठरण्यासाठी आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. विराट आत आयपीएलच्या एका मोसमात एक हजार धावा फटकावण्याचा विक्रम नोंदवण्यास उत्सुक आहे. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाला मिळणाऱ्या आॅरेंज कॅपच्या शर्यतीत विराट ९१९ धावांसह सर्वांत आघाडीवर आहे. विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेला सनराझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरने आतापर्यंत ७७९ धावा फटकावल्या आहे. तो विराटपेक्षा १४० धावांनी पिछाडीवर आहे. रविवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत या दोन्ही फलंदाजांचा खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. विराट यंदा टी-२० क्रिकेटमध्ये शानदार फॉर्मात आहे. त्याने आयपीएलमध्येही कामगिरीत सातत्य राखले. विराटने १५ सामन्यांत ८३.५४ च्या सरासरीने आणि १५१.९० च्या स्ट्राईक रेटने ९१९ धावा फटकावल्या आहेत. त्यात चार शतके व सहा अर्धशतकांचा समावेश आहे.विराट अंतिम लढतीत ८१ धावा फटकावत आयपीएलच्या इतिहासात एका पर्वात एक हजार धावा फटकावणारा जगातील पहिला फलंदाज म्हणून विक्रम नोंदवण्यास उत्सुक आहे तर वॉर्नर त्याला पिछाडीवर सोडत आॅरेंज कॅपचा मान मिळवण्यास प्रयत्नशील आहे. काही चमत्कार घडला तरच वॉर्नरला ही कॅप पटकावता येईल. कारण विराट शून्यावर बाद झाला तरी त्याला पिछाडीवर सोडण्यासाठी वॉर्नरला १४१ धावांची खेळी करावी लागेल आणि सध्याच्या घडीला हे शक्य वाटत नाही. वॉर्नरने १६ सामन्यांत ५९.९२ च्या सरासरीने आणि १४९.२३ च्या स्ट्राईक रेटने ७७९ धावा फटकावल्या आहेत. त्यात आठ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बेंगळुरूचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याने १५ सामन्यांत ५६.८३ च्या सरासरीने ६८२ धावा फटकावल्या आहेत. आयपीएलच्या नवव्या पर्वात अंतिम लढतीत विराट गृहमैदानावर खेळणार असल्यामुळे त्याचे पारडे वरचढ भासत आहे. चिन्नास्वामी मैदानावर विराटचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित असतील. दरम्यान, हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने यंदाच्या मोसमात स्वत:ला सिद्ध केले असून संघाला अंतिम फेरी गाठून दिली. उभय संघांनी प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे जेतेपद पटकावून देण्याची उभय संघांच्या कर्णधारांवर मोठी जबाबदारी आहे. (वृत्तसंस्था)