शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधानंतरही ऑलिम्पिक रद्द होणार नाही - आयओसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 06:10 IST

आयओसी प्रवक्ते मार्क ॲडम्स म्हणाले, ‘आम्ही लोकांचे मत जाणून घेऊ शकतो, मात्र त्याआधारे निर्णय होणार नाही. स्पर्धा होतीलच!’ ॲडम्स हे आयओसी प्रमुख थॉमस बाक यांचे प्रतिनिधी म्हणून येथे आले आहेत

जिनेव्हा : टोकियो ऑलिम्पिकला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असला तरी आयोजन रद्द होणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने गुरुवारी स्पष्ट केले. आयओसीच्या वार्षिक बैठकीनंतर बुधवारी पत्रपरिषद बोलविण्यात आली होती, मात्र निदर्शकांनी व्हर्च्युअल पत्रपरिषदेत अडथळा आणला.कोरोनामुळे टोकियोसह जपानच्या अनेक शहरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीतील ऑलिम्पिकचे आयोजन रद्द व्हावे, अशी अनेकांची मागणी आहे.आयओसी प्रवक्ते मार्क ॲडम्स म्हणाले, ‘आम्ही लोकांचे मत जाणून घेऊ शकतो, मात्र त्याआधारे निर्णय होणार नाही. स्पर्धा होतीलच!’ ॲडम्स हे आयओसी प्रमुख थॉमस बाक यांचे प्रतिनिधी म्हणून येथे आले आहेत. बाक यांचा दौरा कोरोनामुळे रद्द करण्यात आला. अखेरचा प्रश्न विचारण्याआधीच एका निदर्शकाने ऑलिम्पिक होणार नाहीत, असा धमकीवजा संदेश दिल्याने पत्रपरिषद गुंडाळण्यात आली. ॲडम्स यांनी या अडथळ्यांकडे दुर्लक्ष केले. ते म्हणाले,‘बाक येथे असते तर हा स्टंट आणखी रोमांचक ठरला असता.’

आयोजन कठीण ; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत-  संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत ढवळून निघत असताना ऑलिम्पिक आयोजन कठीण असल्याचे मत जपानमधील डॉक्टर्स युनियनने व्यक्त केले आहे. ‘अशा परिस्थितीत सुरक्षित आणि शानदार आयोजन होणे कठीण आहे. आमचा आयोजनास विरोध असल्याचे या तज्ज्ञांनी म्हटले आहे. - टोकियोतील आयोजनादरम्यान जपानमध्ये जगभरातून कोरोनाच्या नव्या साथीचा शिरकाव होणे शक्य असल्याचा धोका या तज्ज्ञांनी एका लेखी निवेदनात व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Japanजपान