शालेय स्पर्धेने गाठली शंभरी खेळांची संख्या १०१ वर : क्रीडा खात्याचा सपाटा चालू महेश पाळणे, लातूर : राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने नवीन खेळांना
By Admin | Updated: December 3, 2014 22:35 IST2014-12-03T22:35:49+5:302014-12-03T22:35:49+5:30
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने १० नोव्हेंबर रोजी नवीन १२ खेळांना शालेय स्पर्धेत समाविष्ट केले होते. तत्पूर्वी गतवर्षीही काही खेळांना शालेय स्पर्धेत स्थान देण्यात आले होते. बुधवारी परत क्रीडा आयुक्तांच्या आदेशाने दोन नव्या खेळांना मान्यता देण्याच्या निर्णयाचे पत्र जिल्हा क्रीडा कार्यालयात येऊन धडकले. यात स्पीडबॉल व तेंग सु डो या दोन खेळांचा समावेश आहे. ९९ वर पोहोचलेल्या शालेय खेळांचे या दोन नवीन खेळांमुळे शतक पूर्ण झाले आहे. पूर्वी शालेय स्पर्धेत ६५ खेळांचा समावेश होता. यात अनुदानित ३२ तर विनाअनुदानित ३३ खेळांचा समावेश होता. महिला क्रीडा स्पर्धेत १२ तर ग्रामीण क्रीडा स्पर्धेत १० अशा एकूण ८७ खेळांचा समावेश होता. आठ दिवसांपूर्वीच नवीन बारा खेळांमुळे ही संख्या ९९ वर पोहोचली होती. आता या दोन खेळांमुळे शालेय खेळांची संख्या १०१ वर जाऊन पोहोचली आहे. या सततच्या नवीन

शालेय स्पर्धेने गाठली शंभरी खेळांची संख्या १०१ वर : क्रीडा खात्याचा सपाटा चालू महेश पाळणे, लातूर : राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने नवीन खेळांना
क रीडा व युवक सेवा संचालनालयाने १० नोव्हेंबर रोजी नवीन १२ खेळांना शालेय स्पर्धेत समाविष्ट केले होते. तत्पूर्वी गतवर्षीही काही खेळांना शालेय स्पर्धेत स्थान देण्यात आले होते. बुधवारी परत क्रीडा आयुक्तांच्या आदेशाने दोन नव्या खेळांना मान्यता देण्याच्या निर्णयाचे पत्र जिल्हा क्रीडा कार्यालयात येऊन धडकले. यात स्पीडबॉल व तेंग सु डो या दोन खेळांचा समावेश आहे. ९९ वर पोहोचलेल्या शालेय खेळांचे या दोन नवीन खेळांमुळे शतक पूर्ण झाले आहे. पूर्वी शालेय स्पर्धेत ६५ खेळांचा समावेश होता. यात अनुदानित ३२ तर विनाअनुदानित ३३ खेळांचा समावेश होता. महिला क्रीडा स्पर्धेत १२ तर ग्रामीण क्रीडा स्पर्धेत १० अशा एकूण ८७ खेळांचा समावेश होता. आठ दिवसांपूर्वीच नवीन बारा खेळांमुळे ही संख्या ९९ वर पोहोचली होती. आता या दोन खेळांमुळे शालेय खेळांची संख्या १०१ वर जाऊन पोहोचली आहे. या सततच्या नवीन खेळांमुळे शासनाचे क्रीडा धोरण न समजण्याजोगे झाले आहे. एकिकडे नवनवीन खेळांना शासन मान्यता देत असली तरी जुन्या खेळांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचे क्रीडा क्षेत्रातून बोलले जात आहे.म्हणे दर्जा सुधारायचा आहे...शालेय स्पर्धेत वाढत्या नवीन खेळांची संख्या लक्षात घेता हा सपाटा क्रीडा खात्याने का चालू केला, याबाबत माहिती घेतली असता एसजीएफआय (स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया) मध्ये हे खेळ आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा दर्जा घसरत आहे. त्यामुळे नवीन खेळांना मान्यता देऊन हा दर्जा सुधारण्याचा क्रीडा खात्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र जुन्या खेळांकडे अधिक लक्ष दिले तरी त्यातही पदके मिळू शकतात. मात्र शासनाचे हे धोरण क्रीडा क्षेत्राला वेगळ्या वाटेवर घेऊन जात आहे. मैदाने व खेळाडूही दिसेनात... नव्याने मान्यता दिलेल्या काही खेळांची मैदाने शहरात दिसत नाहीत. सरावाचे तर लांबच. यासोबतच जिल्हा क्रीडा कार्यालयात असलेल्या चार क्रीडा अधिकार्यांवर शंभर खेळांचे ओझे यामुळे स्पर्धेचा दर खालावणार नाही का? तसेच एकाच व्यक्तीकडे अनेक खेळांच्या संघटना ही बाबही लक्ष वेधून घेत आहे.