शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

पंतप्रधानांच्या सुरक्षेशीच तडजोड होत असेल तर...; पंजाबमध्ये घडलेल्या घटनेवरून 'फुलराणी' सायना नेहवाल संतापली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 6:56 PM

कृषी कायदे रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर होते. पण

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठं बळ पंजाब-हरियाणातून मिळालं होतं. अखेर कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर होते. पण, फिरोजपूर येथील रॅलीसाठी निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अडवण्यात आला. यावरून भाजपाचे सर्व नेते आक्रमक झाले आहेत. त्यात भारताची फुलराणी सायना नेहवाल हीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

मागण्या मान्य होत नाही तोवर भाजपाच्या प्रत्येक रॅलीला विरोध करणार असल्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांमधील संताप कमी होईल असं वाटत होतं परंतु पंजाबमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पंतप्रधान मोदींची रॅली असल्यानं शेतकरी विरोध करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता. तरीही पंजाब सरकारकडून सुरक्षा व्यवस्थेत गलथानपणा दाखवण्यात आला. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

सायना नेहवाल म्हणाली, 'पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड झाल्यास कोणतेही राष्ट्र स्वत:ला सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते.'' आमच्याकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली नाही, सीएम चन्नी यांचे स्पष्टीकरणमुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचानक परतावे लागले याचे मला दु:ख आहे. आम्ही पंतप्रधानांचा आदर करतो आणि मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिसीव्ह करण्यासाठी भटिंडाला जाणार होतो, पण माझ्यासोबत आलेले काही लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या संपर्कात मी आल्यामुळे पंतप्रधानांना रिसीव्ह करायला जाणे टाळले. 

सायना नेहवालची कारकीर्द

  • सायनानं आतापर्यंत 24 आंतरराष्ट्रीय जेतेपदं पटकावली आहेत. तिनं तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. BWFच्या बहुतांश स्पर्धांमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. तिनं BWF वर्ल्ड चॅम्पियनशीप, BWF वर्ल्ड ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर पदकं आहेत. 
  • ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. शिवाय वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय बॅडमिंटनपटूचा मानही सायनाच्या नावावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत ( 2010 आणि 2018) दोन सुवर्णपदक नावावर असणारी ती पहिलीच भारतीय आहे.  2016मध्ये तिला पद्म भुषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्यानंतर तिला राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारही देण्यात आला.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSaina Nehwalसायना नेहवाल