‘आयओसी’कडून नीता अंबानी यांना नामांकन

By admin | Published: June 4, 2016 02:23 AM2016-06-04T02:23:57+5:302016-06-04T02:23:57+5:30

भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या सहमालकीन नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीसाठी (आयओसी) नामांकन मिळाले आहे

Nita Ambani nominations from 'IOC' | ‘आयओसी’कडून नीता अंबानी यांना नामांकन

‘आयओसी’कडून नीता अंबानी यांना नामांकन

Next

मुंबई : भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या सहमालकीन नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीसाठी (आयओसी) नामांकन मिळाले आहे. आयओसीच्या १२९व्या सत्राची निवडणूक ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियो येथे २ ते ४ आॅगस्ट दरम्यान होणार आहे.
आयओसी सदस्यांच्या निवडीसाठी स्वतंत्र निवड प्रक्रिया नव्या पद्धतीने होते. ही प्रक्रिया आॅलिम्पिक अजेंडा २०२० च्या सूचनांवर आधारित असून यामध्ये एकदा निवडून आल्यानंतर ती व्यक्ती वयाच्या ७०व्या वर्षांपर्यंत सदस्य राहू शकते.
याबाबतीत नीता अंबानी यांनी सांगितले की, ‘‘आयओसीसाठी नामांकन मिळणे ही खरंच माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. युवा खेळाडूंच्या विकासामध्ये खेळांच्या निर्णायक भूमिकेमध्ये माझा विश्वास आहे. खेळांच्या माध्यमांतून विविध संस्कृती, समुदाय आणि पिढी एकाच वेळी एका मंचावर येत असतात. मला ही संधी दिल्याबद्दल मी आयओसीचे आभार मानते.’’
त्याचप्रमाणे, ‘‘ही बाब भारत आणि भारतीय महिलांना जागतिक स्तरावर स्वत:ची ओळख दाखवण्याची संधी आहे आणि आयओसीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मी माझे सर्वोत्तम योगदान देईल,’’ असेही नीता अंबानी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
याआधी भारतामध्ये खेळांच्या विकासासाठी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या नीता अंबानी यांनी युवा खेळाडूंचे क्रीडा क्षेत्राकडे लक्ष वेधले. दखल घेण्याची बाब म्हणजे, आयओसीद्वारा नामांकित होणारी पहिली भारतीय महिला म्हणून नीता अंबानी यांनी मान मिळविला आहे.
आयओसीचे कार्यालय स्वित्झर्लंडला असून, ही संस्था आॅलिम्पिक मोहिमेची सर्वोच्च संस्था आहे. उन्हाळी आणि हिवाळी तसेच पॅरालॅम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी या संस्थेकडे असते.
याआधी आयओसीमध्ये पहिले भारतीय प्रतिनिधी म्हणून सर दोराबजी टाटा होते. तर राजा रणधीर सिंग विद्यमान आयओसी सदस्य आहेत. ते २००० ते २०१४ सालादरम्यान सदस्य राहिले होते.
आॅलिम्पिक चार्टर व आयओसी नियमांनुसार अशा स्वयंसेवकांच्या श्रेणीनुसार नीता अंबानींचा विचार केला आहे, ज्यामध्ये ते आॅलिम्पिक मोहीम व आयओसीमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतील. आयओसीमध्ये ते आपल्या देशाचे प्रतिनिधी नसतील.
आयओसीच्यावतीने सत्रामध्ये नवीन सदस्यांची निवड होते. आयओसी नामांकन समिती प्रत्येक उमेदवाराच्या फाईलचा बारकाईने अभ्यास करून कार्यकारी समितीकडे आपला अहवाल पाठविते. यानंतर सत्रामध्ये आपला प्रस्ताव ठेवला जातो आणि गुप्तपणे मतदानाद्वारे सदस्यांची निवड होते.

Web Title: Nita Ambani nominations from 'IOC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.