शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

न्यूझीलंडची ‘ग्राँट’ व्हिक्टरी

By admin | Updated: March 25, 2015 01:21 IST

विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या आणि अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस पद्धतीच्या आधारावर ४ गडी व १ चेंडू राखून पराभव केला

फायनलमध्ये गृहप्रवेश : डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे द. आफ्रिकेचा ४ विकेटने पराभवआॅकलंड : विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या आणि अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस पद्धतीच्या आधारावर ४ गडी व १ चेंडू राखून पराभव केला आणि प्रथमच विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये मोक्याच्या क्षणी ‘चोकर्स’ ठरण्याची परंपरा दक्षिण आफ्रिका संघाने याही वेळी कायम राखली. विश्वकप स्पर्धेच्या मांडवात आम्ही यजमान असून, आता निर्णायक क्षणी आम्ही माडंवाबाहेर कसे जाणार..? आता पाहुणचाराची वेळ संपली असून मांडवाबाहेर जाण्याची परंपरा पाहुण्यांना पाळायची... अशा थाटात मंगळवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडने विजय मिळवून दक्षिण आफ्रिका संघाला विश्वकप स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने रचलेल्या पायावर ग्रांट इलियटने विजयाचा कळस चढविला. १९७५ साली झालेल्या पहिल्या विश्वचषकापासून स्पर्धेत सहभागी होत असूनही सात वेळा सेमीफायनलचा अडथळा पार करता न आलेल्या न्यूझीलंडने यंदा प्रथमच फायनलचा उंबरठा ओलांडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य फेरीत न्यूझीलंडला संस्मरणीय विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा होता दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला ग्रांट इलियट. ग्रांट इलियटच्या नाबाद झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा चोकर्स असल्याचे सिद्ध करून उपांत्य फेरीत डकवर्थ-लुईस पद्धतीच्या आधारावर ४ गडी राखून विजय मिळविला आणि आयसीसी क्रिकेट विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. दक्षिण आफ्रिकेने दिलेले २९८ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. विक्रमी सातव्यांदा उपांत्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या न्यूझीलंडने इलियटच्या ७३ चेंडूंतील ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने खेळल्या गेलेल्या नाबाद ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर १ चेंडू व ६ गडी राखून विजय साकारला. इलियटने कोरी अँडरसनसोबत (५८) पाचव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. त्याने डेल स्टेनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. यासाठी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने केवळ २६ चेंडूंमध्ये ५९ धावांची खेळी करून न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला. दक्षिण आफ्रिकेने फॅफ ड्यू प्लेसिस (१०७ चेंडू, ८२ धावा), कर्णधार एबी डिव्हिलियर्स (४५ चेंडू, नाबाद ६५ धावा) यांच्या चमकदार फलंदाजीनंतर डेव्हिड मिलरच्या (१८ चेंडू, ४९ धावा) आक्रमक खेळीच्या जोरावर ५ बाद २८१ धावांची मजल मारली. त्यामुळे ही लढत प्रत्येकी ४३ षटकांची खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. द़आफ्रिकेच्या पराभवात सुमार क्षेत्ररक्षणाची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना बाद करण्याची काही नामी संधी गमावल्या. इलियट दोनदा सुदैवी ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला मॅक्युलमने पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने २२ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली. त्याआधी, मिलरला आज विश्वकप स्पर्धेत वेगवान अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम नोंदविण्याची संधी होती; पण त्यात तो अपयशी ठरला. मिलरने डिव्हिलियर्ससोबत ४ षटकांत ५५ धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिका संघाने ३८ षटकांत ३ बाद २१६ धावांची मजल मारली होती. त्यानंतर मिलरच्या खेळीच्या जोरावर अखेरच्या ५ षटकांत त्यांनी ६५ धावांची भर घातली. (वृत्तसंस्था) ६ चेंडू १२ धावा... शेवटच्या षटकाचा थरार...अखेरच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी १२ धावांची गरज... चेंडू दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेनच्या हाती... व्हेटोरीकडे स्ट्राईक, त्याला साथ देण्यासाठी ग्रांट इलियट.. व्हेटोरीला पहिल्याच चेंडूवर बायची एक धाव... दुसऱ्या चेंडूवर इलियटला एक धाव... तिसऱ्या चेंडूवर व्हेटोरीने वसूल केला चौकार... चौथ्या चेंडूवर व्हेटोरीने घेतली बायची एक धाव... न्यूझीलंडला अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी पाच धावांची गरज... इलियटने स्टेनच्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला आणि स्टेडियममध्ये उपस्थित न्यूझीलंडच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. दक्षिण आफ्रिका संघाने आज मोक्याच्या क्षणी अनेक चुका केल्या. कर्णधार डिव्हीलियर्सने कोरी अँडरसनला धावचित करण्याची संधी गमावली. चेंडू हातातून सुटून हाताने बेल्स उखडल्या. त्यानंतरही तो धावचित होवू शकला असता, पण गडबडीत डिव्हीलियर्स स्टम्प उखडून चेंडू लावायला विसरला. त्यानंतर ४१व्या षटकात इलियटला धावबाद करण्याची संधी गमावली. रिली रोसेयूने केलेला थ्रो यष्टिरक्षक डिकॉकला व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही. त्यानंतरच्या षटकात इलियटचा मोर्कलच्या गोलंदाजीवर उडालेला झेल टिपण्यासाठी बेहरदीन सरसावला; पण फाईन लेगला तैनात जेपी ड्युमिनी मध्येच कडमडल्यामुळे हा झेल सुटला. याशिवाय एक झेल घेण्यासाठी ड्युप्लेसिस, आमला आणि रोसेयू असे तिघे धावले पण चेंडू तिघांच्यामध्ये पडला.न्यूझीलंडला २९ मार्च रोजी मेलबोर्न मैदानावर खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत गत चॅम्पियन भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार न्यूझीलंडपुढे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. ईडन पार्कवर पावसाच्या व्यत्ययामुळे जवळजवळ दोन तासांचा खेळ वाया गेला.सांघिक कामगिरीमुळे विजयहा विजय केवळ माझ्यासाठी किंवा संघासाठी आहे, असे वाटत नसून हा विजय येथे उपस्थित सर्व चाहत्यांसाठी आहे. दडपणाखाली खेळताना विजय मिळविण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला, अशी प्रतिक्रिया सामनावीर ग्रॅण्ट इलियटने व्यक्त केली. ‘‘मी खेळताना शांत भासत असलो तरी ४५ हजार प्रेक्षक प्रत्येक चेंडूवर जल्लोष करीत असताना वेगळेच दडपण जाणवत होते़दक्षिण आफ्रिका : हाशिम आमला त्रि. गो. बोल्ट १०, क्विंटन डिकॉक झे. साऊदी गो. बोल्ट १४, फेफ ड्यू प्लेसिस झे. रोंची गो. अँडरसन ८२, रिली रोसेयू झे. गुप्तिल गो. अँडरसन ३९, एबी डिव्हिलियर्स नाबाद ६५, डेव्हिड मिलर झे. रोंची गो. अँडरसन ४९, जेपी ड्युमिनी नाबाद ८. अवांतर : १४. एकूण : ४३ षटकांत ५ बाद २८१. बाद क्रम : १-२१, २-३१, ३-११४, ४-११७, ५-२७२. गोलंदाजी : साऊदी ९-१-५५-०, बोल्ट ९-०-५३-२, हेन्री ८-२-४२-०, व्हेटोरी ९-०-४६-०, विलियम्सन १-०-५-०, इलियट १-०-९-०, अँडरसन ६-०-७२-३.न्यूझीलंड : मार्टिन गुप्तिल धावबाद ३४, ब्रँडन मॅक्युलम झे. स्टेन गो. मोर्कल ५९, केन विलियम्सन त्रि. गो. मोर्कल ६, रोस टेलर झे. डिकॉक गो. ड्युमिनी ३०, ग्रांट इलियट नाबाद ८४, कोरी अँडरसन झे. ड्यू प्लेसिस गो. मोर्कल ५८, ल्युक रोंची झे. रोसेयू गो. स्टेन ८, डॅनियल व्हेटोरी नाबाद ७. अवांतर : १३. एकूण : ४२.५ षटकांत ६ बाद २९९. बाद क्रम : १-७१, २-८१, ३-१२८, ४-१४९, ५-१५२, ६-१६९. गोलंदाजी : स्टेन ८.५-०-७६-१, फिलँडर ८-०-५२-०, मोर्कल ९-०-५९-३, ताहीर ९-१-४०-०, ड्युमिनी ५-०-४३-१, डिव्हिलियर्स ३-०-२१-०. सचिनने थोपटली न्यूझीलंडची पाठ, द. आफ्रिकेला दिला धीरविश्वचषकाची प्रथमच अंतिम फेरी गाठणाऱ्या न्यूझीलंड संघाचे मास्टर ब्लास्टर सचिन याने अभिनंदन केले असून, त्यांच्याकडून उपांत्य लढतीत चार गड्यांनी पराभूत झालेल्या द. आफ्रिकेला धीर दिला आहे. सचिन टिष्ट्वटरवर म्हणाला, ‘‘शानदार क्रिकेट खेळून अंतिम फेरी गाठल्याबद्दल न्यूझीलंडचे अभिनंदन. दुसरीकडे उपांत्य फेरीच्या सामन्यात कुण्या संघाला पराभूत होताना पाहून वाईट वाटते. द. आफ्रिकेने खेळ केला.’’ अनिल कुंबळेने द. आफ्रिकेबद्दल सहानुभूती व्यक्त केली. विजयासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या संघाला भाग्याची साथ नव्हती, असे कुंबळेने टिष्ट्वट केले.

 

 

71 धावा न्यूझीलंडने पहिल्या पाच षटकांत चोपून काढल्या. २००१ नंतर एकदिवसीय सामन्यातील पहिल्या पाच षटकांतील दुसरी सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. पहिल्या पाच षटकांत सर्वाधिक धावा ठोकण्याचा न्यूझीलंडचाच क्रमांक असून त्यांनी २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध ७८ फटकावल्या होत्या.482 धावा आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने विश्वचषकात आपल्या नावे नोंदविल्या. आफ्रिकेकडून जॅक कॅलिसनंतर दुसरा विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कॅलिसने २००७ मध्ये ४८५ धावा केल्या होत्या. कर्णधार म्हणून डिव्हिलियर्सची धावसंख्या तिसरी ठरली आहे. यापूर्वी २००७ मध्ये जयवर्धनेने ५४८, रिकी पाँटिंगने २००७ मध्येच ५३९ धावा केल्या होत्या. 25 धावा ब्रँडन मॅक्युलमने डेल स्टेनच्या पाचव्या षटकांत कुटल्या होत्या. त्यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. त्याने एका षटकात यापूर्वी २००६ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना २४ धावा कुटल्या होत्या. 22 चेंडूत म्यॅक्युलमने अर्धशतक नोंदविले. अशी खेळी करण्याची ही त्याची चौथी वेळ राहिली आहे. मार्क बाऊचर याने विश्वचषकात अशी कामगिरी केली होती. 21 गडी बाद करण्याची नोंद न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या नावे झाली आहे. विश्वचषकात २० गडी बाद करण्याची किमया १९९९ मध्ये जिआॅफ अ‍ॅलोटच्या नावावर नोेंद आहे. 272 अशी सर्वाधिक सरासरी विश्वचषकात मिलरची राहिली. त्याने १८ चेडूत ४९ धावा ठोकल्या. सर्वाधिक सरासरी राखणारा हा तिसरा फलंदाज ठरला.192 असा मॅक्युलमचा स्ट्राईक रेट विश्वचषकात राहिला. (कमीत कमी पाच डाव) पहिल्या तीनजणांच्या यादीत यानंतर ग्लेन मॅक्सवेल (१८३.५) आणि आंद्रे रसेल (१८५.७) यांचा क्रमांक लागलो. 2 फलंदाज न्यूझीलंडकडून एकदिवसीय सामन्यांत ३००० पेक्षा अधिक धावा नोंदविणारे ठरले आहेत. मॅक्युलम (३०१४) आणि नॅथन अ‍ॅस्ले (३४४८) यांचा समावेश आहे. 300 एकदिवसीय सामने न्यूझीलंडमध्ये खेळले गेले. पहिल्या आठ राष्ट्रांमध्ये यजमानपद स्वीकारणारा आणि ३०० एकदिवसीय सामने खेळण्याची नोंद वेस्ट इडिज, पाकिस्तान, श्रीलकेच्या नावे आहे.