शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझिलंडला २०२ धावांत गुंडाळले

By admin | Updated: November 27, 2015 23:52 IST

कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथमच गुलाबी रंगाने खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात मिशेल स्टार्क, जोश हेझलवुड यांनी प्रत्येकी ३

अ‍ॅडीलेड : कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथमच गुलाबी रंगाने खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात मिशेल स्टार्क, जोश हेझलवुड यांनी प्रत्येकी ३, तर नॅथन लियोन व पीटर सिडल यांनी प्रत्येकी दोन बळी घेत न्यूझिलंडचा पहिला डाव २०२ धावांत संपुष्टात आणला. दिवसा अखेर आॅस्ट्रेलियाच्या २ बाद ५४ धावा झाल्या होत्या. अ‍ॅडिलेड ओव्हल मैदानावर शुक्रवारी या ऐतिहासिक सामन्यास सुरूवात झाली. न्यूझिलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने नाणेफेक जिंकून घेतलेला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरविला. न्यूझिलंडचा सलामीवीर मार्टीन गुप्तील (१) याला हेझलवुडने पायचीत करीत पहिला झटका दिला. टॉम लॅथम (५०) याचा अपवाद वगळता एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. त्याने १०३ चेंडूत ७ चौकारांसह अर्धशतकी खेळी केली. केन विल्यम्सन (२२), रॉस टेलर (२१), मिशेल सेंटनर (३१), बीजे. वाटलिंग (२९) मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. कर्णधार मॅक्युलम देखील केवळ ४ धावा काढून तंबुत परतला. स्टार्कने २४ धावांत ३, हेझलवुडने ६६ धावांच्या मोबदल्यात ३ गडी तंबूत धाडत न्यूझिलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.आॅस्ट्रेलियाचा २५ वर्षीय युवा खेळाडू फिलिप ह्युज याच्या मृत्यूला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या स्मरणार्थ खेळाडू दंडावर काळी फित लावून मैदानावर उतरले होते. आॅस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळलेल्या फिलिपला गेल्या वर्षी सिडनीत झालेल्या एका घरगुती सामन्या दरम्यान उसळता चेंडू डोक्याला लागल्याने मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला होता. यावेळी व्हीडिओ स्क्रीनवर फिलिबच्या संबंधातील एक व्हिडिओ दाखविण्यात आला. तसेच त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी क्रिकेटपटू तीन मिनिटे ड्रेसिंगरुमच्या बाहेर आले होते. आॅस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पीटर सीडलने शुक्रवारी डोव ब्रेसवेल याला जो बर्न्स याच्याकरवी झेल बाद करीत दोनशेवा बळी मिळविला. भारताविरुद्ध २००८साली मोहालीत झालेल्या सामन्यात या ३१वर्षीय खेळाडूने पदार्पण केले होते. हा त्याचा ५८वा कसोटी सामना आहे.