शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नेदरलँड्स तिस-या स्थानावर!

By admin | Updated: July 13, 2014 04:11 IST

फिफा विश्वचषकात तिस-या स्थानासाठी झालेल्या सामन्यात नेदरलँडसने ब्राझीलचा ३ - ० ने पराभव करीत तिसरे स्थान पटकावले.

नेदरलँड्सकडून ब्राझीलचा ३-० ने पराभव 
ऑनलाइन टीम 
ब्रासालिया, दि. १३ - फिफा विश्वचषकात तिस-या स्थानासाठी झालेल्या सामन्यात नेदरलँडसने ब्राझीलचा ३ - ० ने  पराभव करीत तिसरे स्थान पटकावले. जर्मनीकडून सपाटून मार खाणा-या ब्राझील संघाला पुन्हा एकदा मोठया पराभवाला सामोरे जावे लागले. 
फिफा विश्वचषक २०१४ चा प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या ब्राझील संघाला नेयमारच्या अनुपस्थितीत एकापाठोपाठ एक पराभवाचे धक्के बसले आहेत. आधी जर्मनीकडून ७-१ असा दारूण पराभव पत्कारावा लागल्यानंतर ब्राझीलचा संघ तिसरे स्थान मिळविण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल असे वाटत होते परंतू नेदरलँडविरूध्द सामन्यात ब्राझीलच्या एकाही खेळाडूला सामन्यात सूर गवसला नाही. उलट नेदरलँडसच्या खेळाडूंनी पहिल्या मिनिटापासून सामन्यावर पकड ठेवली. सामन्याच्या तिस-याच मिनिटाला पर्सेइने गोल नोंदवित नेदरलँडसला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १७ व्या मिनिटाला ब्लाईंडने दुसरा गोल करीत ब्राझीलला ब्लाईंड केले. पहिल्या हाफ टाईममध्ये आघाडी मिळालेल्या नेदरलँडस संघाकडून दुस-या हाफ टाईममध्येही गोल करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतू अखेरच्या ९० व्या मिनिटाला विज्नाल्डमने गोल करीत नेदरलँडसला ३-० ने विजय मिळवून दिला. व  फिफा विश्वचषकात नेदरलँडसला तिस-या स्थानी बसवले. सलग दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याने ब्राझीलवासियांवर शोककळा पसरली.