शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 20:55 IST

Neeraj Chopra vs Arshad Nadeem: पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर दोघे पहिल्यांदाच आमने-सामने येतील.

Neeraj Chopra vs Arshad Nadeem: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर ७ मे रोजी भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून, त्याचा क्रीडा क्षेत्रावरही परिणाम दिसून येतोय. या सर्वांमध्ये, चाहत्यांना लवकरच भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठी लढत पाहायला मिळणार आहे. पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर आता पुन्हा एकदा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम आमनेसामने येणार आहेत.

नीरज-अर्शद भिडणारनीरज चोप्रा आणि अर्शद नदीम सिलेसिया डायमंड लीग २०२५ मध्ये एकमेकांना भिडतील. ही स्पर्धा १६ ऑगस्ट रोजी पोलंडमध्ये होणार आहे. पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर या दोन्ही दिग्गजांमध्ये होणारा हा सामना पहिलाच असेल. गेल्या वेळी पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये नदीमने ९२.९७ मीटर थ्रो करून सुवर्णपदक जिंकले होते, तर नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आता चाहते पुन्हा एकदा या दोन्ही दिग्गजांमधील रोमांचक स्पर्धेची वाट पाहत आहेत.

सिलेसिया डायमंड लीग २०२५ ची अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु आयोजकांनी पुष्टी केली आहे की, दोन्ही खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. नीरज चोप्राने या वर्षी चांगली सुरुवात केली आहे. त्याने दोहा डायमंड लीगमध्ये ९०.२३ मीटर थ्रो करून दुसरे स्थान पटकावले. हा थ्रो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती. याशिवाय, त्याने पॅरिस डायमंड लीग २०२५ मध्ये ८८.१६ मीटर थ्रो करून पहिले स्थान पटकावले. 

आतापर्यंत १० वेळा आमनेसामनेनीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांनी आतापर्यंत १० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना अनेक वेळा आव्हान दिले असून, प्रत्येक वेळी ही लढत चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरली आहे. विशेष म्हणजे, अर्शद नदीम फक्त एकदाच नीरज चोप्राला हरवू शकला आहे. अशा परिस्थितीत, सिलेसिया डायमंड लीगमधील ही लढत दोन्ही खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राIndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर