शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

‘नवोदित मुंबई श्री’ किताबावर परळच्या अनिल बिलावाचा कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 1:58 AM

परळच्या अनिल बिलावा याने शरीरसौष्ठव स्पर्धेचा कोणताही अनुभव नसताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत नुकत्याच झालेल्या स्पर्धेत नवोदित मुंबई श्री किताब पटकावला.

मुंबई : परळच्या अनिल बिलावा याने शरीरसौष्ठव स्पर्धेचा कोणताही अनुभव नसताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत नुकत्याच झालेल्या स्पर्धेत नवोदित मुंबई श्री किताब पटकावला. त्याचप्रमाणे, परब फिटनेस संघाच्या महम्मद हुसेन खान याने उत्कृष्ट पोझरचा मान मिळवला. विशेष म्हणजे एकूण ७ वजनी गटांतील ही स्पर्धा अत्यंत अटीतटीची झाली; आणि प्रत्येक गटामध्ये कंपेरिझन केल्यानंतर गटविजेत्याची निवड करण्यात आली.गोरेगाव पूर्वेकडील पांडुरंग वाडीच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत सहभागी सर्व शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या पीळदार शरीरयष्टीने उपस्थितांना भुरळ पाडली. सुमारे तीन हजारांहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावताना खेळाडूंचा उत्साह वाढवला. प्रत्येक वजनी गटामध्ये ३०-३५ खेळाडू सहभागी झाल्याने सुरुवातीला १० आणि त्यानंतर अव्वल ५ खेळाडूंची निवड करताना परीक्षकांना चांगलीच कसरत करावी लागली. ५५ किलो आणि ६० किलो वजनी गटाचा अपवाद वगळता प्रत्येक गटाचा विजेता वेगवेगळ्या जिमचा ठरला. ५५ आणि ६० किलो वजनी गटात हेमंत भंडारी व विपुल सावंत याबॉडी वर्कशॉपच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले.अंतिम फेरीत ७५ किलो वजनी गटाच्या अनिल बिलावापुढे इतर सहा गटविजेते फिके पडले. त्याची लक्षवेधी शरीरयष्टी परीक्षकांनाही मोहित करणारी ठरली. शिवाय प्रेक्षकांनीही अनिलचाच जयघोष केल्याने स्पर्धेचा विजेता कळण्यास फार उशीर झाला नाही.>गटनिहाय निकाल :५५ किलो वजनी गट : १. हेमंत भंडारी(बॉडी वर्कशॉप), २. नितेश कोळेकर (परब फिटनेस), ३. संजय आंग्रे (राहुल).६० किलो : १. विपुल सावंत (बॉडी वर्कशॉप), २. महेश कांबळे (गुरूदत्त), ३. सुमीत यादव (बॉडी वर्कशॉप).६५ किलो : १. रूपेश चव्हाण (एलटी फिटनेस), २. अभिषेक पाटील (गुरूदत्त), ३. सलीम शेख (बॉडी वर्कशॉप).७० किलो : १. मकरंद दहिबावकर (किट्टी जिम), २. शेख कादर बादशाह (गुरूदत्त), ३. सुनील गुरव (वेट हाउस).७५ किलो : १. अनिल बिलावा (हर्क्युलस जिम), २. महम्मद हुसेन खान (परब), ३. हेमंत कंचावडे (फॉर्च्युन फिटनेस).स्पर्धेचा निकाल :नवोदित मुंबई श्री : अनिल बिलावाउत्कृष्ट पोझर : महम्मद हुसेन खान