नवी मुंबईची कन्या ‘अर्जुन पुरस्कारा’ची मानकरी
By Admin | Updated: August 30, 2015 22:45 IST2015-08-30T22:45:19+5:302015-08-30T22:45:19+5:30
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे हिला शनिवारी दिल्ली येथे मानाचा राष्ट्रीय ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान

नवी मुंबईची कन्या ‘अर्जुन पुरस्कारा’ची मानकरी
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे हिला शनिवारी दिल्ली येथे मानाचा राष्ट्रीय ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत या पुरस्कार वितरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
रेडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिलाषा म्हात्रेने २०१२ साली झालेल्या महिला विश्वचषक तसेच २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलीे. सातव्या इयत्तेपासून अभिलाषाने कबड्डीसाठी कसून मेहनत घेतली. या राष्ट्रीय सन्मानाने नवी मुंबई शहराचे नाव उंचावले असून सर्वच स्तरांमधून अभिलाषाचे कौतुक केले जात आहे. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती सभापती नेत्रा
शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले,
क्रीडा सभापती प्रकाश मोरे यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून अभिलाषावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.