शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

National sports day: क्रीडा संस्कृती फुलण्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 10:53 IST

अलीकडील काही वर्षांमध्ये भारत क्रीडाक्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती करीत आहे. अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू पदके पटकावत आहेत. आपल्या खेळाडूंचे हे यश वाखाणण्यासारखे असले, तरी जागतिक स्तरावर तुलनात्मकदृष्ट्या

अमोल मचाले

अलीकडील काही वर्षांमध्ये भारत क्रीडाक्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती करीत आहे. अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू पदके पटकावत आहेत. आपल्या खेळाडूंचे हे यश वाखाणण्यासारखे असले, तरी जागतिक स्तरावर तुलनात्मकदृष्ट्या विचार करता, आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा असल्याचे स्पष्ट होते. क्रीडाक्षेत्रात दबदबा असलेले देश आणि आपल्यात असलेला निर्णायक फरक म्हणजे स्पोर्ट्स कल्चर, अर्थात क्रीडा संस्कृती. २१व्या शतकाच्या पहिल्या दशकापासून आपल्याकडे क्रीडा संस्कृतीने मूळ धरायला प्रारंभ केला असला, तरी त्याची वाढ पाहिजे त्या गतीने झालेली नाही. यामुळेच आॅलिम्पिक वा जागतिक स्पर्धांसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचे सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडाप्रकारांतील यश मर्यादित राहिले आहे. भारतात खऱ्या अर्थाने क्रीडा संस्कृती फुलली, तरच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिरंगा सातत्याने डौलाने फडकू शकेल. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आपण ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करीत आहोत. आजच्या या दिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही यशस्वी खेळाडूंनी क्रीडा संस्कृती रुजण्यासाठी मांडलेली ही भूमिका...खेळाडू यशस्वी होण्यासाठी मदत करा,यशस्वी झाल्यावर नव्हे : दत्तू भोकनळआॅलिम्पिकपटू दत्तू भोकनळ याने सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंगमध्ये सांघिक प्रकारात देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. क्रीडा संस्कृती फुलण्यासंदर्भात आपले मत मांडताना तो म्हणाला, ‘‘आपल्याकडे क्रीडा संस्कृती खºया अर्थाने फुलण्यासाठी मुळापासून बदल व्हायला हवेत. गुणवान खेळाडू यशस्वी होण्यासाठी त्याला योग्य ती मदत करायला हवी. मात्र, आपल्याकडे उलटे आहे. खेळाडू यशस्वी झाल्यावर त्याला मदत जाहीर केली जाते. आर्थिक मदत, योग्य मार्गदर्शन याअभावी अनेक खेळाडू क्षमता असूनही पुढे येऊ शकत नाहीत. याचा फटका आपल्याला कमी पदकांच्या रूपात बसतो. हे टाळायचे असेल, तर खेळाडूतील गुणवत्ता बालपणीच हेरून त्याला शासन-प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळायला हवी. यात प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते.’’ वशिलेबाजी ही खेळाला लागलेली कीड आहे. याचा फटका भारतीय क्रीडाक्षेत्राला २ पद्धतींनी बसतो. एक तर यामुळे गुणवान खेळाडू मागे पडतो. दुसरे म्हणजे, क्षमता नसलेल्या खेळाडूला संधी मिळते; मात्र तो पदक जिंकून देऊ शकत नाही. खेळात कामगिरीवर फोकस हवा, पैशावर नव्हे. शालेय स्तरावर मैदानी खेळांना महत्त्व देण्यात यावे. मैदानावर खेळाडूंचा घाम निघालाच पाहिजे. शक्य झाल्यास क्रीडा हा विषय शालेय स्तरापासून अनिवार्य करण्यात यावा, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.शालेय शिक्षणाप्रमाणे खेळ हा विषयहीसक्तीचा करण्यात यावा : अंकिता रैनाकाही काळ पुण्यात वास्तव्य केलेली मूळची अहमदाबादची टेनिसपटू अंकिता रैना हिने सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आश्वासक कामगिरी करताना कांस्यपदक प्राप्त केले. सध्या भारताच्या क्रीडाक्षेत्रातील वाटचालीबाबत तिने समाधान व्यक्त केले. अंकिता म्हणाली, ‘‘आपल्या देशात आता क्रीडा संस्कृती बºयापैकी रुजली आहे. ती फुलण्यासाठी, त्याची फळे मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल. प्राथमिक स्तरापासून खेळाला प्राधान्य द्यायला हवे. खेळामुळे विद्यार्थिदशेत नुकसान होत नाही; उलट फायदाच होतो हे मी अनुभवातून सांगू शकते. खेळात लवकर निर्णय घ्यावे लागतात; त्यामुळे ‘टाइम मॅनेजमेंट’ची सवय लागते. खेळामुळे आकलनक्षमता वाढते. टेनिस स्पर्धा खेळण्यासाठी मला अनेकदा बाहेर जावे लागायचे; त्यामुळे शाळा-कॉलेज नियमितपणे करता आले नाही. मात्र, परीक्षा तोंडावर असताना वेळेवर अभ्यास करूनही मी समाधानकारक गुण मिळवून ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकले. बीएमसीसी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या मदतीमुळेच मी शिक्षणात येथवर मजल मारू शकले. भविष्यात आपला भारत देश क्रीडाक्षेत्रात यशस्वी व्हावा, यासाठी अनेक प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून शालेय शिक्षणाप्रमाणे खेळ हा विषय सक्तीचा करण्यात यावा. यासाठी केंद्रीय स्तरावर योग्य ती योजना आखण्यात यावी. गुजरातमध्ये दर वर्षी ‘खेलकुंभ’, अर्थात स्पोर्ट्स फेस्टिव्हल आयोजित केला जातो. यात सर्व वयोगटांतील नागरिक सहभागी होतात. समाजात खेळांबाबत अधिकाधिक जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी देशपातळीवर ‘खेलकुंभ’सारखे प्रयत्न व्हायला हवे.’’हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जीवनपटल्ल जन्म : २९ आॅगस्ट १९०५, अलाहाबाद (उत्तर प्रदेश)ल्ल शिक्षण : १९१० ते १९२० (सहावीपर्यंत)ल्ल नोकरी : १९२२, सेनादलात शिपाईपदावर सुरुवातल्ल हॉकीचा श्रीगणेशा : १९२२ल्ल हॉकीतील पहिले विजेतेपद : १९२३, सेनादल स्पर्धाल्ल राष्टÑीय स्पर्धा जिंकून आॅलिम्पिकसाठी निवड : १६ फेब्रुवारी १९२८, कोलकताल्ल अ‍ॅमस्टरडॅम आॅलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्ण. - १९२८ल्ल १९३२ लॉस एंजेलिस आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णल्ल १९३४ : वेस्टर्न आशियाई स्पर्धेत सुवर्ण (प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व)ल्ल १९३५ : भारताचा न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया दौराल्ल २ मे १९३५ : डॉन ब्रॅडमन यांची आॅस्ट्रेलियात भेटल्ल १९३६ : आॅलिम्पिक सुवर्णपदकाची हॅट्ट्रिकल्ल १९५६ : सेनादल संघाकडून श्रीलंका दौरा, सेनादलातून निवृत्त होण्यापूर्वी मेजरपद बहालल्ल ६ आॅक्टोबर १९५६ : राष्टÑपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ल्ल ३ डिसेंबर १९७९ : आजाराने निधनल्ल डिसेंबर १९९४ : ध्यानचंद यांचा २९ आॅगस्ट हा जन्मदिवस ‘राष्टÑीय क्रीडा दिन’ घोषितल्ल २९ आॅगस्ट १९९५ : दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणल्ल ५ डिसेंबर १९८० : पोस्ट खात्याद्वारे मेजर ध्यानचंद यांच्या छायाचित्राचे तिकीट प्रकाशितल्ल ८ मार्च २००२ : दिल्लीतील नॅशनल स्टेडियमचे ‘मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम’ असे नामकरण.ल्ल २९ आॅगस्ट २००५ : जन्मशताब्दीनिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देण्यास केंद्र शासनाकडून प्रारंभ.आॅलिम्पिकविजेते घडविण्याच्या उद्देशानेसुविधा उपलब्ध व्हाव्यात : राहुल आवारेआपल्या देशात क्रीडा संस्कृतीची वाढ संथ आहे. देशातील अनेक भागांत खेळाशी संबंधित प्राथमिक गरजाही पूर्ण होत नाहीत. खेळाडू घडत असताना त्याच्याकडे योग्य लक्ष द्यायला हवे, जे दिले जात नाही. इतर देशांमध्ये १०-१२व्या वर्षी खेळाडूतील क्षमता हेरून त्याला आॅलिम्पिक सेंटर वा स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटरमध्ये पाठविले जाते. आॅलिम्पिकविजेता होईपर्यंत त्या खेळाडूचा सर्व प्रकारचा खर्च तेथील सरकार करते. आपल्याकडे अशी कोणतीही प्रभावी योजना नाही किंवा एखादी असल्यास ती कागदापुरती मर्यादित असते. मागील १०-१२ वर्षांत अनेक क्रीडाप्रकारांमध्ये आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत; मात्र अजूनही त्याचे प्रमाण पाहिजे तसे वाढू शकलेले नाही. आपल्याकडे तालुका, जिल्हा स्तरावर क्रीडासंकुले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी योग्य सुविधा आणि दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध असेल, तरच त्याला अर्थ आहे. अशा क्रीडासंकुलांमध्ये आॅलिम्पिकविजेते घडविण्याच्या उद्देशाने सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता मल्ल राहुल आवारे याने व्यक्त केली.

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघ