लय भारी! स्वप्निलला 'अर्जुन' पुरस्कार; आईसमान कोच दीपाली देशपांडे यांचा 'द्रोणाचार्य' पुरस्काराने सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:39 IST2025-01-02T16:26:49+5:302025-01-02T16:39:26+5:30
ऑलिम्पिक मेडलिस्ट स्वप्निल कुसाळेसह त्याच्या कोच दीपाली देशपांडे यांटा राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

लय भारी! स्वप्निलला 'अर्जुन' पुरस्कार; आईसमान कोच दीपाली देशपांडे यांचा 'द्रोणाचार्य' पुरस्काराने सन्मान
Swapnil Kusale Arjuna Award And His Coach Deepali Deshpande Dronacharya Award : भारत सरकारकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. एवढेच नाही तर त्याला नेमबाजीचे धडे देणाऱ्या कोच दीपाली देशपांडे यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात हा महाराष्ट्रासाठी खास आणि अभिमानास्पद क्षण ठरेल.
स्वप्निलच्या यशात कोच देशपांडे मॅडम यांचा मोलाचा वाटा
स्वप्निल कुसाळे हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवा़डी या छोट्याशा गावातून येतो. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारा तो महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला. माजी भारतीय नेमबाज अन् कोच दीपाली देशपांडे यांचा त्याच्या यशात मोलाचा वाटा राहिला आगे.
कोच दीपाली देशपांडे यांना आईसमान मानतो स्वप्निल
स्वप्निल कुसाळेनं अनेकदा आपल्या वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये कोच मॅडम या फक्त माझ्यासाठी गुरु नाहीत तर त्या माझ्यासाठी आईप्रमाणेच आहेत, असे सांगितले आहे. त्यामुळे एका बाजूला लेकाला अर्जुन पुरस्कार अन् दुसऱ्या बाजूला त्याला घडवणाऱ्या आणि यशापर्यंत पोहचण्यासाठी बळ देणाऱ्या आणि आईसमान कोच दीपाली देशपांडे यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान होणं ही क्रीडा क्षेत्रातील खास अन् दुहेरी आनंद देणारी गोष्ट आहे. २०२४ मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्निल कुसाळे याने पुरुष गटातील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती.