नरेनची भारत दौ:यातून माघार
By Admin | Updated: October 5, 2014 01:37 IST2014-10-05T01:37:34+5:302014-10-05T01:37:34+5:30
चॅम्पियन्स लीग टी-2क् मध्ये दोन वेळा संशयास्पद गोलंदाजी अॅक्शनमुळे निलंबित झालेला वेस्ट इंडिजचा ऑफ स्पिनर गोलंदाज सुनील नरेन याने भारताविरुद्धच्या आगामी दौ:यातून माघार घेतली़

नरेनची भारत दौ:यातून माघार
>नवी दिल्ली : चॅम्पियन्स लीग टी-2क् मध्ये दोन वेळा संशयास्पद गोलंदाजी अॅक्शनमुळे निलंबित झालेला वेस्ट इंडिजचा ऑफ स्पिनर गोलंदाज सुनील नरेन याने भारताविरुद्धच्या आगामी दौ:यातून माघार घेतली़
वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या (डब्ल्यूआयसीबी) प्रवक्त्याने सांगितले की, संशयास्पद गोलंदाजी अॅक्शनमुळे चॅम्पियन्स लीगमध्ये बंदीचा सामना करणा:या नरेनला मायदेशी बोलविण्यात आले आह़े भारत दौ:यातही त्याच्याविरुद्ध गोलंदाजी शैलीची तक्रार होण्याची शक्यता असल्याने विंडीज मंडळाने हा निर्णय घेतला आह़े या अनुभवी खेळाडूच्या गोलंदाजीवर बंदी घातल्याने त्याला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) कडून चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या फायनलमध्ये खेळता येणार नाही़ वेस्ट इंडिज निवड समितीचे संचालक क्लाईव्ह लॉईड यांनी चॅम्पियन्स लीगमधून नरीन
बाहेर झाल्यामुळे निराशा व्यक्त केली आह़े ते म्हणाले, आमचा सवरेत्कृष्ट गोलंदाज फायनलमधून बाहेर झाला याचा खेद आह़े अशात भारताविरुद्ध मालिकेवर परिणाम होऊ नये म्हणून त्याला मायदेशी बोलविले आह़े