शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

बेर्डिचकडून नदालचा धक्कादायक पराभव

By admin | Updated: January 28, 2015 02:18 IST

दुखापत आणि खराब फॉर्मशी झगडणारा स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याच्यावर आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झेक

मेलबोर्न : दुखापत आणि खराब फॉर्मशी झगडणारा स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याच्यावर आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झेक प्रजासत्ताकाच्या टॉमस बेर्डिचकडून पराभवाची नामुष्की ओढावली़ ब्रिटनचा अँडी मरे, रशियाची मारिया शारापोव्हा यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला़पुरुष गटातील एकेरीत सातवे मानांकनप्राप्त बेर्डिचने १४ वेळा ग्रँडस्लॅमविजेत्या आणि तृतीय मानांकनप्राप्त नदालवर २ तास आणि १३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-२, ६-०, ७-६ अशा फरकाने मात करताना थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला़ बेर्डिचला पुढच्या सामन्यात ब्रिटनच्या अँडी मरेशी झुंज द्यावी लागेल़ दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत २ तास आणि ५ मिनिटे चाललेल्या लढतीत मरे याने आॅस्ट्रेलियाच्या १९ वर्षीय निक किर्गियोस याच्यावर ६-३, ७-६, ६-३ अशा सरळ सेटमध्ये सहज मात करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला़महिला एकेरी गटात द्वितीय मानांकनप्राप्त रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हा हिने लौकिकाला साजेसा खेळ करताना ७८ मिनिटांत कॅनडाच्या इयुगेनी बुचार्ड हिचे आव्हान ६-३, ७-६, ६-३ अशा फरकाने मोडीत काढून उपांत्य फेरी गाठली़ मारियाला सेमीफानलमध्ये आपल्याच देशाच्या इकतेरिना मकारोव्हाचा सामना करावा लागणार आहे़ दहावे मानांकनप्राप्त मकारोव्हा हिने रुमानियाच्या तृतीय मानांकित सिमोना हालेपवर ६-४, ६-० असा शानदार विजय मिळवून आगेकूच केली़ स्पर्धेत सर्वांची नजर नदाल आणि बेर्डिच यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यावर होती़ अखेर नदालविरुद्ध १७ वेळा पराभवाचे तोंड पाहावे लागल्यानंतर बेर्डिचने पहिला विजय मिळविला़ बेर्डिच सलग दुसऱ्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे़