शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कडक सॅल्युट! भारतीय खेळाडूची ८.३७ मीटर 'झेप', आनंद महिंद्राही झाले फॅन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 13:05 IST

murali sreeshankar world athletics : मुरली श्रीशंकर पॅरिस २०२४ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. 

Asian Athletics Championships : भारतीय ॲथलीट लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये त्याने रौप्य पदक जिंकून तिरंग्याची शान वाढवली. श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडी प्रकारात ८.३७ मीटरच्या प्रयत्नात रौप्य पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले. लक्षणीय बाब म्हणजे या कामगिरीसह तो पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरला आहे. मुरली श्रीशंकरच्या या लांब उडीने प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील आपलंसं केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी मुरलीचा हा व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.

आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट ठरला. पॅरिसमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी लांब उडीचे अंतर ८.२७ मीटर आहे. खरं तर चायनीज खेळाडूने चौथ्या फेरीत ८.४० मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले, जो या हंगामातील जगातील तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे. 

आनंद महिंद्राही झाले फॅन

आनंद महिंद्रा यांनी मुरलीचे कौतुक करताना म्हटले, "थायलंडमधील २५व्या आशियाई थलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये श्रीशंकर मुरलीच्या ८.३७ मीटर झेपमुळे तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्याने त्याच्या शेवटच्या प्रयत्नात ही किमया साधली. यावेळी तो वाघासारखी डरकाळी फोडत होता. आपण सर्वजण देखील ती झेप घेण्याचा प्रयत्न करू शकतो. ती झेप ज्यामुळे आपण सध्या जे काही करत आहे त्यात बदल होऊ शकतो."

भारताच्या रिले संघाने जिंकले सुवर्ण तसेच राजेश रमेश, ऐश्वर्या कैलाश मिश्रा, अमोज जेकब आणि सुभा वेंकटेशन यांच्या भारतीय मिश्र ४×४०० मीटर रिले संघाने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. यासोबतच त्यांनी एक नवा राष्ट्रीय विक्रम देखील नोंदवला. भारतीय ॲथलीट अनिल सर्वेश कुशारे आणि स्वप्ना बर्मन यांनी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ च्या चौथ्या दिवशी अनुक्रमे पुरुषांच्या उंच उडी आणि महिलांच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत रौप्य पदके जिंकली.     

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीIndiaभारतSilverचांदीParisपॅरिस