शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

मुंबईची दिल्लीवर यशस्वी स्वारी

By admin | Updated: February 6, 2016 03:15 IST

जयपूर पिंक पँथरकडून झालेल्या निराशाजनक पराभवानंतर गतविजेत्या यू मुंबाने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या दबंग दिल्लीवर ३०-१७ अशी यशस्वी स्वारी करत प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात विजयी कूच

बंगळुरू : जयपूर पिंक पँथरकडून झालेल्या निराशाजनक पराभवानंतर गतविजेत्या यू मुंबाने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या दबंग दिल्लीवर ३०-१७ अशी यशस्वी स्वारी करत प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात विजयी कूच केली. त्याचवेळी दिल्लीकरांनी सलग चौथा सामना गमावताना पराभवाचा चौकार लगावला. यानंतरच्या सामन्यात बंगळुरू बुल्सने अनपेक्षित निकाल नोंदवताना बलाढ्य जयपूर पिंक पँथर्सला ३६-२६ असा धक्का दिला. श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात यू मुंबाने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने खेळत आपला इरादा स्पष्ट केला. ९व्या मिनिटालाच मुंबईकरांनी दिल्लीवर लोण चढवून १०-२ अशी भक्कम आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. त्यातच १५व्या मिनिटाला दिल्लीचा हुकमी काशिलिंग आडके जखमी झाल्याने मैदानाबाहेर गेला. मध्यांतराला यू मुंबाने १६-७ अशी आघाडी घेत वर्चस्व राखले. यानंतर मुंबईने आणखी आक्रमक पवित्रा घेताना दिल्लीकरांना कबड्डीचे धडेच दिले. कर्णधार अनुप कुमार, रिशांक देवाडिया यांनी आक्रमक चढाया करताना दिल्लीवर प्रचंड दबाव टाकले; तर मोहित चिल्लर व सुरेंद्र नाडा यांनी दमदार पकडी करताना त्यांना चांगली साथ दिली. रिशांकने उत्कृष्ट पकडी करून अष्टपैलू खेळाने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या वेळी मंबईने दिल्लीवर दुसरा लोण चढवून सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला. दिल्लीकडून अनिल कुमार व कुलदीप सिंग यांची झुंज अपयशी ठरली.यानंतर यजमान बंगळुरू बुल्सने सलग दोन पराभवांनंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर येताना बलाढ्य जयपूर पिंक पँथर्सला ३६-२६ असा धक्का दिला. अमित राठी व श्रीकांत तेवठिया यांनी प्रत्येकी एका सुपर टॅकलसह केलेला अष्टपैलू खेळ बंगळुरूच्या विजयात निर्णायक ठरला. जयपूरकडून राजेश नरवालने एकाकी लढत दिली. मध्यांतराला जयपूर एका गुणाने १४-१३ असे आघाडीवर होते. मात्र नंतर यजमानांनी सामना सहज फिरवला.