शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

मुंबईचा दुसरा पराभव

By admin | Updated: January 8, 2016 03:13 IST

श्रेयश अय्यरने झळकावलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीनंतरही मुंबईला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्ध ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला

कटक : श्रेयश अय्यरने झळकावलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीनंतरही मुंबईला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्ध ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेशने मधल्या फळीतील उमंग शर्माच्या (नाबाद ४७) निर्णायक खेळीच्या जोरावर मुंबईने दिलेल्या १६५ धावांचे लक्ष्य २ चेंडू राखून पार केले.बाराबती स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशने मुंबईला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. अखिल हेरवाडकर आणि श्रेयश यांनी मुंबईला शानदार ६७ धावांची सलामी दिली. हेरवाडकरला (२८) बाद करून पीयूष चावलाने ही जोडी फोडली. यानंतर श्रेयशने कर्णधार आदित्य तरेसह ५८ धावांची भागीदारी करून संघाच्या धावसंख्येला आकार दिला. मुंबईच्या धावफलकावर ११२ धावा लागलेल्या असताना श्रेयश अंकित राजपूतचा शिकार ठरला. श्रेयशने ४३ चेंडूत १० चौकार व २ षटकारांसह ७८ धावा कुटल्या. यानंतर मात्र मुंबईच्या फलंदाजीला गळती लागली. ठरावीक अंतराने धक्के देत उत्तर प्रदेशने मुंबईला निर्धारित २० षटकांत ६ बाद १६४ धावांवर रोखले. अंकित राजपूत आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी २ बळी घेताना मुंबईच्या धावसंख्येला ब्रेक दिला. अखेरच्या क्षणी उत्तर प्रदेशने टिच्चून मारा करताना मुंबईकरांना जखडवून ठेवण्यात यश मिळवले. प्रशांत गुप्ता (३३) आणि समर्थ सिंग (१६) यांनी उत्तर प्रदेशला ४० धावांची सलामी दिली. यानंतर कर्णधार सुरेश रैना (२०) आणि अक्षदीप सिंग (१४) यांनीही योगदान दिले. मात्र उमंग शर्माने मुंबईकरांचा खरपूस समाचार घेताना ३२ धावांत ४ चौकार व २ षटकारांसह निर्णायक नाबाद ४७ धावांची खेळी करून उत्तर प्रदेशला विजयी केले. मुंबईकडून धवल कुलकर्णी आणि सिद्धेश लाड यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर प्रवीण तांबे व अभिषेक नायर यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले. यासह सलग चौथा विजय मिळवताना उत्तर प्रदेशने ‘ड’ गटात सर्वाधिक १६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून स्पर्धेच्या सुपर लीग फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. त्याचवेळी मुंबईचा चार सामन्यांतून हा दुसरा पराभव आहे. ८ गुणांसह मुंबईकर तिसऱ्या स्थानी आहेत.मुंबई : २० षटकांत ६ बाद १६४ धावा (श्रेयश अय्यर ७८, अखिल हेरवाडकर २८, अभिषेक नायर नाबाद २२; अंकित राजपूत २/२७, पीयूष चावला २/२१) उत्तर प्रदेश : १९.४ षटकांत ६ बाद १६८ धावा. (उमंग शर्मा नाबाद ४७, प्रशांत गुप्ता ३३; धवल कुलकर्णी २/३१, सिद्धेश लाड २/२७)