शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांचा रेल्वेवर ‘फॉलोआॅन’

By admin | Updated: November 8, 2016 04:08 IST

फिरकी गोलंदाज विजय गोहिलच्या (५/६४) भेदक माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रेल्वेचा पहिला डाव १६० धावांत गुंडाळून त्यांच्यावर फॉलोआॅन लादला

म्हैसूर : फिरकी गोलंदाज विजय गोहिलच्या (५/६४) भेदक माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रेल्वेचा पहिला डाव १६० धावांत गुंडाळून त्यांच्यावर फॉलोआॅन लादला. मुंबईच्या ३४५ धावांचा पाठलाग करताना रेल्वेच्या फलंदाजांनी गोहिलपुढे नांगी टाकली. तिसऱ्या दिवशी ३ बाद ७६ धावांवरुन सुरुवात करताना रेल्वेचा कोणताही फलंदाज मुंबईकरांसमोर आव्हान उभे करु शकला नाही. गोहिलने ६४ धावांत अर्धा संघ बाद करताना रेल्वेची ‘चेन’ खेचली. तर, शार्दुल ठाकूर आणि बलविंदर सिंग संधू या अनुभवी गोलंदाजांनीही प्रत्येकी २ बळी घेत गोहिलला चांगली साथ दिली. कर्णधार कर्ण शर्मा (२४) याने रेल्वेकडून सर्वाधिक धावा काढल्या. तर, आशिष सिंगने २२ धावांची खेळी केली. या दोघांशिवाय कोणालाही वीसचा आकडा पार करता आला नाही. फॉलोआॅन पडल्यानंतर रेल्वेने तिसऱ्या दिवसअखेर ६५ षटकात ४ बाद १३५ धावांची मजल मारली. अजूनही रेल्वे ५० धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सहा फलंदाज शिल्लक आहेत. सलामीवीर सौरभ वाकासकर (३९) आणि अरिंदम घोष (३१) यांनी दुसऱ्या डावात रेल्वेला सावरण्याचा प्रयत्न केला. मुंबईकडून तुषार देशपांडेने ८ धावांत २ बळी घेत रेल्वेला रोखण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. दिवसअखेर फौझ अहमद (१२*) आणि नितिन भिल्ले (१७*) टिकून होते. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :मुंबई (पहिला डाव) : १३३.२ षटकात सर्वबाद ३४५ धावा.रेल्वे (पहिला डाव) : ७०.३ षटकात सर्वबाद १६० धावा (कर्ण शर्मा २४, आशिष सिंग २२; विजय गोहिल ५/६४)रेल्वे (दुसरा डाव) : ६५ षटकात ४ बाद १३५ धावा (सौरभ वाकासकर ३९, अरिंदम घोष ३१; तुषार देशपांडे २/८)