घरच्या मैदानावर मुंबईचा पराभव
By Admin | Updated: April 12, 2015 23:49 IST2015-04-12T23:48:38+5:302015-04-12T23:49:04+5:30
किंग्ज इलेव्हेन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मुंबई इंडियन्सने 18 धावांनी गमवला. शेवटच्या फळीतील फलंदाज हरभजन सिंग वगळता एकही

घरच्या मैदानावर मुंबईचा पराभव
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - किंग्ज इलेव्हेन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मुंबई इंडियन्सने 18 धावांनी गमवला.
शेवटच्या फळीतील फलंदाज हरभजन सिंग वगळता एकही फलंदाज दमदार फलंदाजी करू शकला नाही. हरभजन सिंगने तब्बल पाच चौकार व सहा षटकार लगावत फक्त 24 चेंडूत 64 धावा करत सामना बघण्यास मुंबई इंडियन्सच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवले. हरभजन सह सुचित 34 धावा करत नाबाद राहिला. तर सलामी वीर म्हणून खेळ पट्टीवर आलेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा भोपळा न फोडताच तंबूत परतला. तसेच फिंच व तरे जेम तेम 8 व 7 धावा करत तंबूत परतले. सहा षटकार मारल्याबद्दल हरभजन सिंगला एक लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.