मुंबईच्या सान्वी देशवालचा जलतरणात सुवर्ण धमाका; ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केला पराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:23 IST2025-02-04T11:23:21+5:302025-02-04T11:23:42+5:30
Saanvi Deswal wins gold in swimming : २०० मीटर्स शर्यत आणि ४०० मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात जिंकलं सुवर्ण

मुंबईच्या सान्वी देशवालचा जलतरणात सुवर्ण धमाका; ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केला पराक्रम
Saanvi Deswal wins gold in swimming हल्दवानी : सान्वी देशवाल हिने वैयक्तिक मिडले प्रकारात वर्चस्व प्रस्थापित करताना ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या २०० मीटर्स शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. या आधी तिने याच स्पर्धेमध्ये ४०० मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात सुवर्ण जिंकले होते. श्वेता गुजाळ हिने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅक सायकलिंगमध्ये इलिट स्प्रिंट टू लॅप्स प्रकारात सुवर्ण जिंकले. सान्वीने दोनशे मीटर्स शर्यत दोन मिनिटे २४.९० सेकंदांत पार केली. अदिती हेगडेने ४०० मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत कांस्य आणि ऋतुजा राजाज्ञ, तसेच ऋषभ दास याने कांस्य पदकाची कमाई केली. एक मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात क्षमा बंगेराने कांस्य जिंकले. राहुल बैठा व अंजली सेमवाल यांनी महाराष्ट्राला स्क्वॉशमध्ये उपविजेतेपद मिळवून दिले.