शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत रंगणार जोरदार चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 7:29 PM

मुरकर, बिलावा, सकिंदर, गुरव, सुयश यांच्यात काँटे की टक्कर

ठळक मुद्देअंतिम फेरीसाठी तगडे 48 खेळाडू पात्रपुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् मध्ये खेळाडूंची शंभरीमहिलांच्या गटात पाच नव्हे आठ पीळदार सौंदर्यवती

मुंबई, दि.16 (क्री.प्र.)- तब्बल पाऊणे तीनशे खेळाडूंची उपस्थितीने स्फूर्तीदायक झालेल्dया वातावरणात स्पार्टन मुंबई श्रीचा महोत्सव सुरू झाला. पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य गटात तब्बल 168 शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग आणि फिजीक स्पोर्टस् गटात स्पर्धकांनी गाठलेल्dया शंभरीने आरोग्य प्रतिष्ठानचा मुंबई फिटनेस सोहळा ब्लॉकबस्टर हिट असल्dयाची ग्वाही दिली. आज मुंबईकरांनी मुंबई श्रीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईच्या शरीरसौष्ठवाची ताकद पाहिली. प्रतिष्ठेच्या स्पार्टन मुंबई श्रीसाठी विक्रमी गर्दी करण्याऱया शरीरसौष्ठवपटूंमध्ये आठही गटात अंतिम फेरी गाठण्यासाठी तगडी टक्कर झाली. अत्यंत संघर्षमय झालेल्dया प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी एकापेक्षा एक सरस असलेले 48 खेळाडू निवडण्यात आले असले तरी ऐतिहासिक मुंबई श्रीचा किताब पटकावण्यासाठी विविध गटातून पात्र ठरलेले सुशील मुरकर, अनिल बिलावा, सकिंदर सिंग, रोहन गुरव, सुयश पाटील यांच्यात खरी लढत रंगणार आहे. तरीही मुंबई श्रीत चमकदार कामगिरी करण्याच्या ध्येयाने उतरलेल्dया आणि उत्साहाने भारलेल्dया खेळाडूंनी प्राथमिक फेरीत बाद झाल्dयानंतरही मुंबई श्री में अपना टाइम आएगा, अशी प्रोत्साहित करणारी प्रतिक्रिया देत पुढच्या स्पर्धांसाठी आम्हीही सज्ज होत असल्dयाची कबूली शरीरसौष्ठवपटूंनी दिली.

मुंबई श्रीच्या इतिहासात प्रथमच मुंबईकरांना आणि शरीरसौष्ठवपटूंच्या फिटनेसला डोळ्यासमोर ठेऊन आयोजित केलेल्dया महोत्सवाला खेळाडूंसह मुंबईकरांनीही मनमुराद दाद दिली. भव्यदिव्य आयोजनाची झलक देणाऱया मुंबई श्रीची तयारी आरोग्य प्रतिष्ठानच्या धडपड्या कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन करून सर्वांचीच मनं जिंकली. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या मान्यतेने आयोजित मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेला खेळाडूंच्या विक्रमी उपस्थितीने चारचाँद लावल्dयाची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिली.

आज झालेल्या प्राथमिक स्पर्धेतून प्रत्येक गटातून प्रत्येकी सहा खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. प्रत्येक गटात 20 च्या आसपास खेळाडू असल्यामुळे मुंबईच्या पीळदार ग्लॅमरमधून अवघ्या सहा खेळाडूंची निवड करताना जजेसचा अक्षरशा घामटा निघाला. 55 किलो वजनी गटातून ओमकार आंबोकर, जीतेंद्र पाटील, राजेश तारवे आणि नितीन शिगवण, नितेश कोळेकरपैकी एक गटविजेता होऊ शकतो. 60 किलो वजनी गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी चेतन खारवाला अविनाश वने,आकाश घोरपडे, तुषार गुजर, देवचंद गावडे, अरूण पाटील यांचे आव्हान मोडीत काढावे लागणार आहे. 65 किलो वजनी गटात संदेश सकपाळवर मात करण्यासाठी बप्पन दास, साजिद मलिक, निलेश घडशी, उमेश गुप्ता यांनी कंबर कसली आहे तर 70 किलोच्या गटात संदीप कवडे, गणेश पेडामकर, मनोज मोरे, विशाल धावडे, महेश पवार आणि रोहन गुरवपैकी कुणीही गटविजेतेपद संपादू शकतो, इतका हा गट अटीतटीचा होता.

सुनीत, डोंगरे,पिळणकरही उतरणार

सुनीत जाधव, सचिन डोंगरे आणि सचिन डोंगरे हे तिन्ही मुंबईकर मुंबई श्रीच्या अंतिम फेरीसाठी उतरणार आहे. मात्र ते स्पर्धक म्हणून नव्हे तर आगामी महाराष्ट्र श्री स्पर्धेची निवड चाचणी देण्यासाठी. मुंबई श्री स्पर्धेतून महाराष्ट्र श्री साठी मुंबईचे दोन तगडे संघ निवडले जाणार असून यात या तिघांचीही वर्णी लागणार हे निश्चित आहे.

खरी लढत 75 आणि 80 किलो वजनी गटात

मुंबई श्रीचा खरी हीरा गवसणार आहे तो 75 आणि 80 किलो वजनी गटातून. 75 किलो वजनी गटात लीलाधर म्हात्रे, भास्कर कांबळी, अमोल गायकवाड, मोहम्मद हुसेन आणि अर्जुन पुंचिकुरवे यांच्यापैकी अव्वल कोण येईल याचा अंदाज आज जजेसनाही बांधता आला नाही. 80 किलोच्या गटात तर यापेक्षा अधिक चुरस दिसतेय. नवोदित मुंबई श्रीचा विजेता अनिल बिलावाने मुंबई श्रीवर आपले लक्ष्य पूर्णपणे केंद्रित करता यावे म्हणून तो गेले दोन महिने एकाही स्पर्धेत खेळला नाही. त्याची तयारीही आश्चर्यचकित करणारी झाली आहे. गेले तीन महिने अनेक स्पर्धा जिंकणारा सुशील मुरकरनेही मुंबई श्रीसाठी आपला दावा ठोकला आहे. दोन वर्षांपूर्वी ज्यूनियर मुंबई श्री जिंकणारा सुयश पाटीलही जबरदस्त तयारीत दिसला. गतवर्षी उपविजेता ठरलेला सकिंदर सिंग पुन्हा एकदा मुंबई श्रीचे स्वप्न करण्यासाठी सज्ज झालाय. त्याचबरोबर अभिषेक खेडेकर, सुशांत रांजणकर, निलेश दगडे यांचीही तयारी तोडीची झालेली दिसतेय. त्यामुळे ऐतिहासिक स्पार्टन मुंबई श्रीचा चषकात किसका टाइम आया है, हे रविवारीच कळू शकेल.

महिला गटात संघर्ष वाढला...

मिस मुंबईसाठी होणाऱया फिजीक स्पोर्टस् प्रकारात पाच पीळदार सौंदर्यवतींचा सहभाग आधीच निश्चित होता. पण आज वजन तपासणीच्या वेळेला विणा महाले, रेणूका मुदलीयार आणि प्रतिक्षा करकेरा या तिघींनीही आपल्dया नावाची नोंद केली आणि या गटात खेळणाऱया महिला खेळाडूंची संख्या आठ झाली. या गटात मंजिरी भावसार आणि दिपाली ओगले यांच्यात जेतेपदासाठी काँटे की टक्कर असली तरी नीना पंजाबी, हीरा सोलंकी आणि निशरिन पारिखचेही आव्हान त्यांच्यासमोर असेल. महिलांचा शरीरसौष्ठव खेळात सहभाग वाढावा म्हणून आमला ब्रम्हचारी आणि श्रद्धा डोके या मराठी कन्या आपल्dया पीळदार स्नायूंचे प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांची प्रदर्शनीय लढत महिला शरीरसौष्ठवाला नक्कीच प्रोत्साहन देईल, असा विश्वास आरोग्य प्रतिष्ठानचे आयोजक प्रभाकर कदम यांनी व्यक्त केला आहे.

स्पार्टन मुंबई श्री 2019 अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले खेळाडू55 किलो वजनी गट ः अजिंक्य पवार (बाळ व्यायाम मंदिर), जितेंद्र पाटील(माँसाहेब), ओंकार आंबोकर (बॉडी वर्पशॉप), राजेश तारवे (माँसाहेब), नितीन शिगवण (वक्रतुंड), नितेश कोळेकर (परब फिटनेस)60 किलो ः अरूण पाटील (जय भवानी), अविनाश वने (आर.एम.भट),चेतन खारवा (माँसाहेब), आकाश घोरपडे (करमरकर जिम), देवचंद गावडे(परब फिटनेस), तुषार गुजर (माँसाहेब)65 किलो ः बप्पन दास ( आरकेएम), निलेश घडशी (बॉडी वर्पशॉप),जगदिश कदम (बॉडी वर्पशॉप), साजिद मलिक (फ्युचर फिटनेस), उमेश गुप्ता(वसंत जिम)70 किलो ः संदीप कवडे ( एच.एम.बी. जिम), गणेश पेडामकर ( बॉडी वर्पशॉप), मनोज मोरे (बाल मित्र), विशाल धावडे (बाल मित्र), महेश पवार(हर्क्युलस जिम), रोहन गुरव (बाल मित्र)75 किलो ः लीलाधर म्हात्रे (कृष्णा जिम), भास्कर कांबळी (ग्रेस जिम),अर्जुन पुंचिकुरवे (गुरूदत्त व्यायामशाळा), मोहम्मद हुसेन (परब फिटनेस),आशिष लोखंडे (रिसेट जिम)80 किलो ः अनिल बिलावा (हर्क्युलस जिम), सुयश पाटील (इन्सेन फिटनेस), सुशील मुरकर (जे.एम.के.एम), सुशांत रांजणकर (आर.एम.भट),मोहम्मद शब्बीर शेख (परब फिटनेस), अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन)85 किलो ः सुबोध यादव (बॉडी वर्पशॉप), निशांत कोळी (वेगस जिम),दिपक तांबीटकर (रिजस फिटनेस), रोमियो बॉर्जेस (परब फिटनेस), सकिंद्र सिंग (फॉर्च्युन फिटनेस), उबेद पटेल (बिस्ट हाऊस जिम)90 किलो ः मलविंदर सिद्धू (साईवस जिम), महेश राणे (बालमित्र जिम),प्रसाद वाळंज ( बॉडी वर्पशॉप), विजय यादव (परब फिटनेस)90 किलोवरील रविकांत पाष्टे (परब फिटनेस), निलेश दगडे (परब फिटनेस)

फिजीक स्पोर्टस् (पुरूष-170 सेंमी) ः महेश गावडे ( आर.के.एम.), लवेश कोळी ( गुरूदत्त व्यायामशाळा), विजय हाप्पे (परब फिटनेस), अनिकेत चव्हाण (रिजिअस जिम), प्रथमेश बागायतकर (परब फिटनेस), मोहम्मद इजाझ खान ( आर.के.एम.)

फिजीक स्पोर्टस् (पुरूष-170 सेंमीवरील) ः आतिक खान ( फॉर्च्युन फिटनेस), स्वराज सिंग ( मेंगन जिम), अनिकेत महाडिक ( हर्क्युलस), मिमोह कांबळे ( न्यूयॉर्प जिम), प्रणिल गांधी ( फॉर्च्युन फिटनेस), शुभम कांदू (बालमित्र)

विमेन्स फिजीक स्पोर्टस् ः मंजिरी भावसार, दिपाली ओगले, नीना पंजाबी,हीरा सोलंकी, वीणा महाले, रेणूका मुदलीयार, निशरीन पारीख, प्रतीक्षा करकेरा

प्रदर्शनीय शरीरसौष्ठव ः श्रद्धा डोके, आमला ब्रम्हचारी

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवMumbaiमुंबई