शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्सची दमदार मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2015 00:08 IST

अंबाती रायडूच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर (नाबाद ५३ धावा, २७ चेंडू सात चौकार, तीन षटकार) मुंबई इंडियन्सने आयपीएल-८ मध्ये शुक्रवारी पाच

रोहित नाईक, मुंबईअंबाती रायडूच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर (नाबाद ५३ धावा, २७ चेंडू सात चौकार, तीन षटकार) मुंबई इंडियन्सने आयपीएल-८ मध्ये शुक्रवारी पाच गड्यांच्या मोबदल्यात १८७ पर्यंत आव्हानात्मक मजल गाठली. यापूर्वी राजस्थानविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केल्यानंतर डावाची अखेरही झकास केली. रायडूने २७ चेंडूत ५३ तर पोलार्डने १४ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले.वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून राजस्थानचा कर्णधार शेन वॉटसनने यजमानांना प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. मुंबईने देखील या संधीचा पुरेपूर फायदा उचलताना झोकात सुरुवात केली. टिम साऊदीच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सिमेन्सचा झेल यष्टीरक्षक संजू सॅमसन याने सोडला. ही चूक राजस्थानला महागात पडली. सिमेन्सने देखील यानंतर साऊदीला पुढे येऊन खणखणीत चौकार लगावत आपला इरादा स्पष्ट केला.धवल कुलकर्णीने पाचव्या षटकांत पार्थिवचा झेल स्वत: टिपत मुंबईला पहिला धक्का दिला. दरम्यान मुंबईने सातव्या षटकापर्यंत अर्धशतक गाठले. सिमन्सने उन्मुक्त चंदच्या सोबतीने दहा षटकापर्यंत ७३ पर्यंत मजल गाठली तोच अंकित शर्माने त्याला पायचित केले. सिमन्सने ३१ चेंडूंत चार चौकार व एका षटकारासह ३८ आणि पार्थिवने १४ चेंडूत पाच चौकारासह २३ धावा केल्या. उन्मुक्त चंद साऊदीच्या चेंडूवर बिन्नीकडे झेल देत परतला.कर्णधार रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करीत धावा खेचण्यावरही भर दिला. रोहित आक्रमक वाटत होता पण राजस्थानच्या गोलंदाजांचा शिस्तबद्ध मारा आणि साजेसे क्षेत्ररक्षण यामुळे मुंबईच्या फलंदाजांना फारशी मोकळीक मिळत नव्हती. १३ व्या षटकाअखेर मुंबईच्या तीन बाद १०० धावा फळ्यावर लागल्या.स्टुअर्ट बिन्नीच्या पुढच्या षटकार रोहितने चौकार आणि रायडूने षटकार खेचल्यानंतर १५ वे षटक टाकण्याची जबाबदारी धवल कुलकर्णीकडे आली. त्याच्या चौथ्या चेंडूवर रोहितने षटकार मारला.पुढचा चेंडू फ्लिक करण्याच्या नादात शॉर्ट फाईन लेगवर अंकित शर्मा याने रोहितचा (२१ चेंडूत २७ धावा) सुरेख झेल टिपला. डावाच्या अखेरच्या तीन षटकांत मुंबईकडून पोलार्ड आणि रायडू यांनी ४९ धावा वसूल केल्या. रायडू अधिक आक्रमक होता. पोलार्ड २४ धावा काढून झेलबाद झाला. हरभजन खाते न उघडता नाबाद राहिला.