शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हॉकी लीग एअर इंडियाचा दणदणीत विजय

By admin | Updated: June 27, 2016 03:10 IST

एअर इंडिया वेस्टर्न रिजन (एआयडब्ल्यूआर) संघाने भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) स्पोटर््स क्लबचा ७-० असा फडशा पाडला

मुंबई : वृषभ ए. याने झळकावलेले धमाकेदार तीन गोल आणि जी. जितेंद्रचे दोन गोल या जोरावर एअर इंडिया वेस्टर्न रिजन (एआयडब्ल्यूआर) संघाने भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) स्पोटर््स क्लबचा ७-० असा फडशा पाडला. यासह एआयडब्ल्यूआर संघाने मुंबई हॉकी लीग स्पर्धेत दुसऱ्या श्रेणीमध्ये दिमाखात आगेकूच केली. मुंबई हॉकी असोसिएशनच्या (एमएचएएल) वतीने चर्चगेट येथील हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी एअर इंडियाने एकतर्फी झालेल्या सामन्यात बीएआरसीला पूर्णपणे दबावाखाली ठेवले. सुरुवातीपासून एअर इंडियाच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. बीएआरसीच्या कमजोर बचावफळीचा फायदा घेत एअर इंडियाने आक्रमक चाली रचून दमदार खेळ केला. वृषभने प्रभावी कामगिरी करताना ३ गोल झळकावले. तसेच जितेंद्रने त्याला योग्य साथ देत दोन शानदार गोल झळकावले. तर आर. राहुल आणि के. अंकुश यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाच्या विजयात हातभार लावला. दरम्यान, बीएआरसीने गोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र एअर इंडियाचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. मोठ्या पिछाडीच्या दडपणाखाली त्यांच्या खेळाडंूमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. दुसरीकडे मध्य रेल्वे मुंबई विभाग व कॅथलिक जिमखाना यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. (क्रीडा प्रतिनिधी)