शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे १०० पेक्षा जास्त खेळाडू पात्र

By admin | Updated: June 26, 2016 17:39 IST

भारताच्या मोहम्मद अनिस, शार्बनी नंदा, अंकित शर्मा तर अनातू दास यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून रियो ऑलिम्पिकसाठी आपले तिकीट पक्के केले.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २६ -  भारताच्या मोहम्मद अनिस, शार्बनी नंदा, अंकित शर्मा तर अनातू दास यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून रियो ऑलिम्पिकसाठी आपले तिकीट पक्के केले. रियोसाठी अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची संख्या आता २३ तर एकूण भारतीय खेळाडूंची संख्या शंभरपेक्षा जास्त झाली आहे. 
 
पोलिश अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मोहम्मद अनिसने पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४५.४० सेकंदांची वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून रिया ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. अनिसने राजीव अरोकियाने नोंदविलेला ४५.४७ सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. कझाकिस्तान येथील अलमाटीमध्ये झालेल्या २६ व्या कोसनोव्ह मेमोरियल स्पर्धेत ओरिसाच्या शार्बनी नंदाने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २३.०७ सेकंदाची वेळ नोंदविली. 
 
दुसरीकडे राष्ट्रीय विजेता मध्य प्रदेशच्या अंकित शर्माने पुरुषांच्या लांब उडी प्रकारात ८.१७ मीटरचे अंतर कापून रियोसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. भारतीय आर्चरी असोसिशनच्या वतीने बंगळुरू येथे निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पश्चिम बंगालचा २४ वर्षीय अनातू दासने वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात रियो ऑलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली.