शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मेस्सीचा धडाकेबाज ‘पंच’

By admin | Updated: January 13, 2016 03:53 IST

सध्या जागतिक फुटबॉलमध्ये आपला एकहाती दबदबा राखलेला अर्जंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने पाचव्यांदा ‘फिफा’चा मानाचा ‘बालोन डी ओर’ पुरस्कार पटकावला.

झुरिक : सध्या जागतिक फुटबॉलमध्ये आपला एकहाती दबदबा राखलेला अर्जंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने पाचव्यांदा ‘फिफा’चा मानाचा ‘बालोन डी ओर’ पुरस्कार पटकावला. यासह त्याने फुटबॉल जगतावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी मेस्सीला पोर्तुगालचा स्टार खेळाडू आणि कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो तसेच बार्सिलोना एफसीमधील आपला सहकारी व ब्राझीलचा अव्वल खेळाडू नेमार यांच्याशी स्पर्धा करावी लागली. मात्र, मेस्सी या दोघांपेक्षा वरचढ ठरला. झुरिकमध्ये झालेल्या वार्षिक ‘फिफा’ बालोन डी ओर पुरस्कार सोहळ्यात मेस्सीला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी लाखो फुटबॉलप्रेमींनी उपस्थिती दर्शवली होती. या पुरस्कारासाठी विजेत्या खेळाडूची निवड राष्ट्रीय संघांचे कर्णधार, प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांद्वारे करण्यात आली. या पुरस्कारासाठी मेस्सीने सर्वाधिक ४१ टक्के मते मिळवली. त्याच वेळी रोनाल्डो आणि नेमार यांना अनुक्रमे २७.७६ टक्के आणि ७.८६ टक्के मते मिळाली. बार्सिलोनाच्या या स्टार खेळाडूने गत वर्षी खेळलेल्या सामन्यांत एकूण ४८ गोल नोंदविले असून, ‘ला लीगा’ स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत मेस्सी दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, २०१४-१५ मोसमामध्ये त्याने सर्वाधिक गोल नोंदविण्याची कामगिरी केली. त्याच वेळी बार्सिलोना संघाचे प्रशिक्षक लुईस एनरिक यांनी ‘फिफा’च्या ‘सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉल प्रशिक्षक’ किताबावर कब्जा केला. तर, महिला फुटबॉल गटात २०१५ महिला विश्वचषकविजेत्या अमेरिका संघाने दोन विजेतीपदे पटकावून आपले वर्चस्व राखले. (वृत्तसंस्था)