शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष नेमबाजांचा कांस्यवरील निशाणा चुकला

By admin | Updated: September 25, 2014 03:44 IST

भारतीय पुरुष संघाचा २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात बुधवारी अटीतटीच्या लढतीत कांस्यपदकावरील निशाणा थोड्या फरकाने चुकला

इंचियोन : भारतीय पुरुष संघाचा २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात बुधवारी अटीतटीच्या लढतीत कांस्यपदकावरील निशाणा थोड्या फरकाने चुकला, तर महिला संघाला ५० मीटर रायफल प्रोन प्रकाराच्या अंतिम फेरीत निराशाजनक कामगिरीमुळे ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले. राष्ट्रकुल स्पर्धेप्रमाणे आशियाई स्पर्धेत नेमबाज पदकांची लयलूट करतील अशी आशा होती, परंतु पाचव्या दिवसालाही नेमबाजांना एकही पदक पटकावता आले नाही. महिला संघात समावेश असलेल्या राज चौधरी, लज्जा गोस्वामी आणि तेजस्विनी मुळे यांनी ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात निराशाजनक कामगिरी केली, तर वैयक्तिक गटातही भारताची झोळी रिकामीच राहिली. त्यानंतर पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात हरप्रीत सिंह, गुरप्रीत सिंह आणि पेंबा तेमांग या संघाला १७०४.३९ गुणांवर समाधान मानावे लागल्याने ते चौथ्या स्थानावर घसरले. व्हिएतनामच्या तान्ह मिन्ह हा, तू थान कियू आणि नाम क्वांग बुई या संघाने १७०४.४१ गुणांसह कांस्यपदक पटकावले. याव्यतिरिक्त वैयक्तिक गटात पुरुष खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. हरप्रीत पात्रता फेरीच्या दुसऱ्या राउंडमध्ये ९८.९७ आणि ९३ गुणांसह सातव्या स्थानावर घसरला. गुरप्रीत ५७.१३ आणि तमांग ५५६.१० गुणांसह अनुक्रमे १२ व्या व २०व्या स्थानावर समाधान मानावे लागले. याआधी झालेल्या महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन गटात भारतीय संघाने एकूण १,८२७ गुणांची कमाई केली आणि त्यांना ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताकडून राज चौधरीने ६१४.६ , गोस्वामीने ६१३.७ आणि मुळेने ६०८.८ गुणांची कमाई केली. वैयक्तिक गटात राज चौधरी, लज्जा गोस्वामी आणि तेजस्विनी मुळे यांना अनुक्रमे २२, २५ व ३६वे स्थान मिळाले. (वृत्तसंस्था)