सोने-हिऱ्यांनी झाकलेली असते मेवेदरची बॉडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 02:42 IST2019-03-03T02:42:50+5:302019-03-03T02:42:58+5:30

लोकप्रिय अमेरिकन बॉक्सर फ्लॉयड मेवेदर याची सोशल मीडियावरील लक्झुरिअस लाइफस्टाइल पाहून लोकांच्या मनात हाच विचार येईल की, आपले अच्छे दिन कधी येतील?

Mayweather body is covered with gold and greens! | सोने-हिऱ्यांनी झाकलेली असते मेवेदरची बॉडी!

सोने-हिऱ्यांनी झाकलेली असते मेवेदरची बॉडी!

मुंबई : लोकप्रिय अमेरिकन बॉक्सर फ्लॉयड मेवेदर याची सोशल मीडियावरील लक्झुरिअस लाइफस्टाइल पाहून लोकांच्या मनात हाच विचार येईल की, आपले अच्छे दिन कधी येतील? ४१ वर्षीय फ्लॉयड सोने आणि किमती हिऱ्यांचे चालते-फिरते दुकान आहे. म्हणजे त्याच्या हातापासून ते गळ्यापर्यंत केवळ सोने आणि हिरेच बघायला मिळतात.
११ फेब्रुवारीला फ्लॉयडने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यातून त्याने त्याची श्रीमंती दाखविली आहे. हा व्हिडीओ जगभरातील ९ कोटी लोकांना पाहिला. यात दिसतेय की, फ्लॉयड एका सोन्याच्या मगमधून ड्रिंक घेतोय आणि त्याच्याकडची महागडी ज्वेलरीसुद्धा तो दाखवितो आहे. इतकेच नाही, तर त्याच्या पायाखाली त्याने लाखो डॉलर्स ठेवले आहेत.
फ्लॉयड हा नेहमीच त्याच्याकडे भरपूर कॅश ठेवतो. मग तो जेवत असो, प्रवास करत असो वा बेडवर झोपलेला असो. तो स्ट्रिप क्लबमध्ये जाऊन रोज लाखो डॉलर्सही खर्च करून येतो. माहितीनुसार, आॅगस्ट, २०१७ मध्ये फ्लॉयडने सर्वात महागड्या फाइटमध्ये मिक्स्ड मार्शल आटर््सचा सुपरस्टार कोनोर मॅकग्रेगोरला मात देऊन ५०वा विजय नोंदविला होता. या विजयानंतर त्याला ६५० कोटी रुपए मिळाले होते. तेच २०१५ मध्ये फ्लॉयडने एका फाइटमधून तब्बल २०० मिलियन डॉलर मिळविले होते.
फ्लॉयडला अल्टिमेट फायटिंगचा किंग मानला जातो. त्याच्याकडे इतका पैसा आहे की, कधी-कधी बँकेतून पैसे आणण्यासाठी त्याला ट्रकचा वापर करावा लागतो. माहितीनुसार, त्याची एकूण संपत्ती ५६० मिलियन डॉलर म्हणजे ४ हजार कोटी रुपये इतकी आहे.

Web Title: Mayweather body is covered with gold and greens!