शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

महापौर बुध्दिबळ ब गट: आंध्रचा पवन विजेता  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 8:05 PM

 मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमधील इलो २००० गुणाखालील ब गटात आंध्र प्रदेशच्या पवन बी.एन.बी. याने जेतेपद पटकावले.

मुंबई : मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमधील इलो २००० गुणाखालील ब गटात आंध्र प्रदेशच्या पवन बी.एन.बी. याने त्याच्या सोबत सर्वाधिक ८.५ गुण घेणाऱ्या पॉन्डिचेरीच्या श्रीहरी एल. आणि महाराष्ट्राच्या नमित चव्हाण यांना सरस सरासरीच्या बळावर मागे टाकले आणि रुपये एक लाख वीस हजारसह ब गट विजेतेपदाचा महापौर चषक जिंकला. व्हीनस चेस अकॅडमीतर्फे मुंबई उपनगर जिल्हा बुध्दिबळ संघटना आयोजित स्पर्धेतील द्वितीय क्रमांक श्रीहरी एल. याने व तृतीय क्रमांक नमित चव्हाणने मिळविला.

साखळी शेवटच्या दहाव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर बाराव्या मानांकित पवन बी.एन.बी.ने कोणताही धोका न पत्करता बिगरमानांकित महाराष्ट्राच्या नमित चव्हाण विरुद्ध २० व्या चालीला बरोबरी स्वीकारली आणि दोघांचेही ८.५ गुण झाले. परंतु उत्कृष्ट सरासरीमुळे पवन बी.एन.बी.ने बाजी मारत प्रथम स्थानाच्या विजेतेपदाला गवसणी घातली. दुसऱ्या पटावर देखील विनोद कुमार वि. वैभव भट यांनी सावध खेळ करीत ६३ व्या चालीला बरोबरी मान्य केली. तिसऱ्या पटावर काळ्या मोहरानी खेळतांना श्रीहरी एल.ने ४६ व्या चालीला दहाव्या मानांकित सौरव साहूला नमविले आणि ८.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. विजेत्यांना पुरस्कार अंकित जेम्सचे चेअरमन अरुण शाह, अखिल भारतीय बुध्दिबळ संघटनेचे खजिनदार किशोर बांदेकर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले व संयोजक रवींद्र डोंगरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

टॅग्स :Chessबुद्धीबळSportsक्रीडा