शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

मेरीकोम अंतिम फेरी गाठण्यास सज्ज; लवलिना बोरगोहेनकडेही असणार लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 1:41 AM

पाच वेळची विश्व चॅम्पियन एम. सी. मेरीकोम (४८ किलो) आणि लवलिना बोरगोहेन (६९ किलो) गुरुवारी येथे केडी जाधव स्टेडियममध्ये आपल्या गटात दहाव्या महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या इराद्याने रिंगमध्ये उतरतील.

नवी दिल्ली : पाच वेळची विश्व चॅम्पियन एम. सी. मेरीकोम (४८ किलो) आणि लवलिना बोरगोहेन (६९ किलो) गुरुवारी येथे केडी जाधव स्टेडियममध्ये आपल्या गटात दहाव्या महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या इराद्याने रिंगमध्ये उतरतील.भारताच्या चार बॉक्सर्सनी पदकांच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. यावेळी, सहाव्या सुवर्ण पदकाच्या प्रयत्नात असलेली मेरीकोम उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग विरोधात लढेल. गुरुवारी पाच वजन गटात उपांत्य फेरीचे सामने होतील. तसेच, पाच अन्य गटात अंतिम चारचे सामने शुक्रवारी होतील.‘मी प्रशिक्षकांसोबत रणनीती बनवली आहे,’ असे मेरीकोमने म्हटले. मेरीकोमने गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत किम ह्यांग हिला पराभूत केले होते. ती अत्यंत आक्रमक असून तिने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या चोरोंग बाक हिला पराभूत केले. मेरीकोम म्हणाली की,‘मला माहीत आहे की गार्ड केव्हा खाली ठेवायचे. आणि पंच केव्हा मारायचा. मी त्यावर खूप काम केले आहे.’दुसरीकडे, २१ वर्षांच्या लवलीनाने वेल्टरवेटमध्ये उपांत्य फेरीत चिनी तैपईच्या चेन निएन चीनविरुद्ध विजय मिळवून आपल्या पराभवाचा वचपा घेण्यास उत्सुक असेल. लवलीना हिने सरावानंतर सांगितले की, ‘मी व्हिडिओ पाहून रणनीती आखली आहे. मला आशा आहे की, त्यातून मला मदत मिळेल.’ लवलीना पदकाच्या फेरीत पोहचल्याने खूश आहे.ती पुढे म्हणाली की, ‘येथे विजय मिळवल्यानंतर माझ्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि या स्पर्धेतील अनुभवाचा पुढील तयारीसाठी फायदा होईल.’दोन अन्य भारतीय सोनिया (५७ किलो) आणि सिमरनजीत कौर (६४ किलो) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी या दोन्ही रिंगमध्ये उतरतील. सोनिया म्हणाली की,‘याआधी उत्तर कोरियाच्या जो सोनकडून माझा पराभव झाला होता. आम्ही एकमेकांच्या शैलीशी परिचित आहोत.’ सिमरनजीत कौर हिने सांगितले की, ‘मी कठोर मेहनत घेत असून लढतीसाठी तयार आहे.’

टॅग्स :Mary Komमेरी कोम