बॉक्सर मेरी कोमचा घटस्फोट होणार? तीन वर्षांपासून नात्यात दुरावा, पती-पत्नीचे वेगवेगळे बिऱ्हाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:27 IST2025-04-08T16:21:57+5:302025-04-08T16:27:19+5:30
Mary Kom Divorce: मेरी कोम एका बिझनेसमनला डेट करत असल्याचीही रंगलीये चर्चा

बॉक्सर मेरी कोमचा घटस्फोट होणार? तीन वर्षांपासून नात्यात दुरावा, पती-पत्नीचे वेगवेगळे बिऱ्हाड
Mary Kom Divorce: भारताची पदकविजेती बॉक्सर एमसी मेरी कोम आणि तिचा पती करुंग ओन्खोलर (ऑनलर) यांच्या नात्यातील अंतर वाढल्याचे बोलले जात आहे. ते दोघे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. मेरी कोम हे बॉक्सिंगच्या जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून तिचे नाव आदराने घेतले जाते. २० वर्षांपूर्वी मेरी कोमने लग्न केले होते, पण आता दोघे विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत. दोघांनी अद्याप घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केलेली नाही, परंतु चर्चा मात्र रंगली आहे.
२०२२ पासून नात्यात दुरावा
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, २०२२च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत ओनलरच्या पराभवानंतर दोघांमधील नात्यात दुराव्याला सुरूवात झाली. या काळात कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अहवालानुसार, बॉक्सर आणि तिची चार मुले फरिदाबादमध्ये राहतात, तर तिचा पती काही कुटुंबातील सदस्यांसह दिल्लीत राहतो.
मेरी कोम दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये?
मेरी कोम आणि ऑन्लरच्या विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान एक वेगळी चर्चाही सुरू आहे. मेरी कोम ही एका बिझनेसमनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेरी कोम तिच्या पतीपासून वेगळी राहायला लागनंतर तिच्या आयुष्यात एक बिझनेसमन आला आणि हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
कोण आहे तो बिझनेसमन?
मेरी कोमचे बिझनेस पार्टनर आणि मेरी कोम फाउंडेशनचे अध्यक्ष हितेश चौधरी यांच्यासोबत तिचे नाव घेतले आहे. त्यांचे मेरी कोमशी थेट नाव जोडलेले नाही, पण हितेश चौधरी हे एका ऑलिंपिक विजेत्या बॉक्सरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्यात त्यांनी मेरी कोमसोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे या चर्चांनी आणखी खतपाणी मिळाले आहे.