शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 12:22 IST

Kerala Pregnant Elephant Death: या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.

भुकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्तीण काहीतरी खायला मिळेल या आशेनं एका वसाहतीत गेली. पण, स्थानिकांनी तिला अननसातून फटाके खायला दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीणीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. केरळ येथील मलाप्पूरम येथे घडलेल्या या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले गेले असले तरी हे कृत्य मानव जातीची मान शरमेनं झुकवणारं असल्याचे मत कुस्तीपटू गीता फोगाटनं व्यक्त केलं.

भारताची कुस्तीपटू गीता म्हणाली,'' मानव जातीच्या पापाचा घडा भरतोय. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.'' कुस्तीपटू योगेश्वर दत्त यानंही या घटनेचा निषेध व्यक्त केला. मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही. मानवाच्या छळाचं एक आणखी उदाहरण. मानव जातीचं अस्तित्व ढासळताना मी पाहत आहे. माणुसकी पुन्हा पराभूत झाली, असं मत कुस्तीपटू बजरंग पुनियानं व्यक्त केलं. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांनीही घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ''आपण रानटी आहोत. अजूनही आपण काहीच शिकलेलो नाही का? केरळमध्ये गर्भवती हत्तीणीसोबत जे घडले ते ऐकून मन हादरून गेले. कोणत्याही प्राण्याला इतकी निर्दयी वागणूक मिळायला नको, असे रोहित शर्मा म्हणाला.

''केरळमध्ये जे घडलं ते ऐकून मन अस्वस्थ झालं. प्राण्यांशी प्रेमाने वागा आणि असे भ्याड कृत्य थांबवा, '' असे आवाहन विराट कोहलीनं केलं आहे. ''माणसांचे अजून एक लाजीरवाणे कृत्य... या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. हत्तीणीनं आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपण तिची निर्दयीपणे हत्या केली,'' अशा शब्दात सुरेश रैनानं राग व्यक्त केला.  

फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री म्हणाला,''ती गर्भवती होती, तिच्याकडून काहीच धोका नव्हता. लोकांनी जे केलं ते अमानवी कृत्य होतं आणि त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. आपण पुन्हा पुन्हा निसर्गाला हानी पोहोचवत आहोत. आपण स्वतःला विकसित प्रजाती कसं म्हणू शकतो?'' 

अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

टॅग्स :KeralaकेरळWrestlingकुस्ती