अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 11:17 AM2020-06-04T11:17:38+5:302020-06-04T11:18:38+5:30

अर्जेंटिना संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं 91 सामन्यांत 34 गोल्स केले. 1986च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनानं जेतेपद पटकावलं होतं. त्या स्पर्धेत त्याला गोल्डन बॉल पुरस्कारही मिळाला होता.

Fact Check : Video featuring 'fake' Diego Maradona goes viral on social media  | अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

Next

दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना नेहमी वादग्रस्त कारणामुळे चर्चेत असतात. प्रशिक्षकाचा कार्यकाळ असो किंवा स्टेडियममध्ये त्यांची उपस्थिती नेहमी वादात अडकली गेली. अर्जेटिंनाचे हे दिग्गज फुटबॉलपटून सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यात दिसणारी व्यकी ही मॅराडोना असल्याचा दावा केला जात आहे. पण, हे खरं आहे का?

या व्हिडीओतील मॅराडोनासारखा दिसणारी व्यक्ती टेनिस चेंडूसह फुटबॉलचा सराव करताना दिसत आहे. एखाद्या सुमो रेसलर प्रमाणे मॅराडोनाचं वजन वाढल्याचा या व्हिडीओतून दिसत आहे. पण, त्याचे फुटबॉल कौशल्य पाहून ही व्यक्ती मॅराडोनाच असल्याचा दावा केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मॅराडोनाला अखेरचे पाहिले गेले तेव्हा त्याचे वजन प्रचंड वाढल्याचे दिसले होते आणि त्यामुळेच व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही मॅराडोनाच आहे, अशी चर्चा रंगली आहे.
पण, हे सत्य नाही. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही रोली सेरानो आहे. 2015मध्ये हॉलिवूड चित्रपट 'यूथ' यामधील तो भाग आहे. त्यामुळे व्हिडीओत दिसणारी व्यक्ती मॅराडोना नाही हे स्पष्ट होत आहे.  




मग मॅराडोना कुठेय?
मॅराडोना सध्या अर्जेटिनातील क्लब गिम्नासिया व्हाय एस्ग्रीमाचे प्रशिक्षकपद भूषवित आहे. बुधवारीच क्लबने त्याच्यासोबतचा करार वाढवला.  

अर्जेंटिना संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं 91 सामन्यांत 34 गोल्स केले. 1986च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनानं जेतेपद पटकावलं होतं. त्या स्पर्धेत त्याला गोल्डन बॉल पुरस्कारही मिळाला होता. 

आपण अजूनही रानटीच आहोत! गर्भवती हत्तीणीच्या हत्येचा रोहित, विराटसह क्रीडा विश्वातून तीव्र निषेध

Web Title: Fact Check : Video featuring 'fake' Diego Maradona goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.