शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल सुशील कुमारला कोर्टाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 07:56 IST

सागर राणा याच्या हत्येप्रकरणी आरोपी, अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : राजधानीच्या उत्तरेला असलेल्या छत्रसाल स्टेडियमबाहेर ज्युनिअर सुवर्णपदक विजेता मल्ल सागर राणा याच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.

पोलिसांचा ससेमिरा चुकवून अज्ञातस्थळी दडून बसलेल्या सुशीलचा शोध घेणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. याशिवाय सुशीलचा खासगी सचिव अजय हा देखील फरार असून, त्याला शोधून देणाऱ्यास ५० हजारांचा रोख पुरस्कार दिला जाईल. सुशील आणि अजयसह अन्य आरोपींविरुद्ध अजामीनपात्र नोटीस बजाविण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जगदीश कुमार यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीच्या वेळी दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केला.

सुशीलचे वकील सिद्धार्थ लुथरा आणि आर. एस. जाखड यांनी सुशीलच्या वतीने सांगितले की, ‘मी आंतरराष्ट्रीय मल्ल आहे. मला पद्मश्रीसह अन्य प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा देशासाठी पदक जिंकले आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये ज्युुनिअर मल्लांच्या प्रशिक्षणासाठी माझी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. मी तेथे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे.’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मे रोजी पहाटे १.१५ ते १.३० या वेळेत छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंग परिसरात मल्लांच्या दोन गटात कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचे रूपांतर मारहाणीत होताच फायरिंग झाले. त्यात पाच मल्ल जखमी झाले असून, त्यात सागर (२३), सोनू (३७), अमित कुमार (२७) आणि दोघांचा समावेश आहे. सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे वडील दिल्ली पोलिसांत हेडकॉन्स्टेबल आहेत. सागर आणि त्याचे मित्र ज्या फ्लॅटवर राहायचे तो फ्लॅट खाली करण्यासाठी सुशील दबाव आणत होता. 

पोलिसांनी घटनास्थळावरून पाच वाहनांसह बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे ताब्यात घेतली. सुशीलवरील गंभीर आरोपांचा तपास सुरू असून, त्याचा शोध घेण्यासाठी दिल्लीसह विविध राज्यांत धाडसत्र सुरूच असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. आधी लूक आउट नोटीस आणि नंतर अजामीनपात्र वॉरंट बजावूनही सुशीलचा पोलिसांना सुगावा लागलेला नाही. न्यायालयाने विविध बाबी तपासल्यानंतर सुशीलसह सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

मला विनाकारण गोवण्यात आलेमला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले. एफआयआर नोंदविणाऱ्याबाबत कुठलीही माहिती नाही. सोनू नावाची व्यक्ती कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्या आधीच्या गुन्ह्यांची कुठलीही नोंद एफआयआरमध्ये नाही. माझा पासपोर्ट पोलिसांनी ताब्यात घेतला. मी बंदुकीतून गोळी झाडली नाही, शिवाय माझ्या गोळीमुळे मृताचा जीव गेलेला नाही. माझ्यावर हत्येचा गुन्हा का नोंदविण्यात आला, हे मला माहिती नाही.-सुशील कुमार

पासपोर्ट ताब्यात घेतला नाहीदिल्ली पोलिसांच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. अतुल श्रीवास्तव म्हणाले, ‘सुशीलचा पासपोर्ट पोलिसांनी ताब्यात घेतलेला नाही. तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून स्वत:कडे ठेवला आहे. आम्हीही सुशीलचा सन्मान करतो. मात्र, ज्या सागर नावाच्या मल्लाची हत्या झाली तोदेखील ज्युनिअर गटाचा सुवर्ण विजेता होता. दिल्ली पोलिसांकडे हत्येचे पुरेसे पुरावे आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमार