शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
2
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
3
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
4
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
5
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
6
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
7
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
8
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
9
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
10
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
11
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
12
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
13
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
14
काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह
15
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
16
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
17
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
18
भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी
19
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
20
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले

चॅलेंजशिल्ड कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या महिला संघाला कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 4:54 PM

 छत्तीसगड राज्यातील रायपुर येथील रायघर येथे आयोजित अखिल भारतीय चॅलेंजशिल्ड कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या महिला कबड्डी संघाने कांस्यपदक पटकावले. तसेच सर्वोत्कृष्ट शिस्तबध्द संघाचा मानही या संघाने मिळविला.

मुंबई : छत्तीसगड राज्यातील रायपुर येथील रायघर येथे आयोजित अखिल भारतीय चॅलेंजशिल्ड कबड्डी स्पर्धेत महावितरणच्या महिला कबड्डी संघाने कांस्यपदक पटकावले. तसेच सर्वोत्कृष्ट शिस्तबध्द संघाचा मानही या संघाने मिळविला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांनी नुकताच विजेत्या संघाचा सत्कार केला.     रायगड येथे 15 ते 18 फेब्रुवारी 2018 दरम्यान आयोजित या स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या महावितरणच्या संघात कर्णधार राजश्री पवार, प्रियंका उगले, तेजश्री गायकवाड (सीपीएफ विभाग, धारावी), पुजा पाटील, अश्विनी शेवाळे (भांडूप), संगीता देशमुख, सायली कचरे (पुणे), हर्षला मोरे (कल्याण) यांचा समावेश होता. संघाचे प्रशिक्षक म्हणून किरण देवडिगा व व्यवस्थापक म्हणून स्मिता साळुंखे (मुख्यालय, मुंबई), यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.    विजेत्या संघाच्या सत्कार प्रसंगी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांच्यासह संचालक (वाणिज्य) श्री. सतिश चव्हाण, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (प्रभारी) श्री संजय ढोके, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी -I श्री पी.एस. पाटील व सहमुख्य जनसंपर्क अधिकारी -II श्री अनिल कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Sportsक्रीडा